शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

बालकांनाही कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बालकांनी कोरोनाशी चांगला लढा दिल्याचे चित्र आहे. ० ते १२ वयोगटातील बालकांचा विचार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील बालकांनी कोरोनाशी चांगला लढा दिल्याचे चित्र आहे. ० ते १२ वयोगटातील बालकांचा विचार करता एकुण बाधीत रुग्णांपैकी केवळ ३९१ अर्थात ७.१० टक्के बालकांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.जिल्ह्यात बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. असे असतांना कोरोनाला मात्र जिल्ह्यातील बालकांनी दूरच ठेवल्याचे चित्र आहे. त्याला कारणे विविध असतील तरीही येत्या काळात आणखी दक्षता घेणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पुर्णपणे दूर झालेला नाही. सद्या रुग्ण संख्या कमी झाली असली तरी हिवाळ्यात कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे सुतोवाच केले जात आहे. त्यामुळे पालक आधीच चिंतेत पडले आहे.

  • एकुण पुरूष बाधीतांमध्ये मुलांचे प्रमाण ७.७९ टक्के.
  • एकुण महिला बाधीतांमध्ये मुलींचे प्रमाण ६.५६ टक्के.

 

  • २३७ बालके बाधीत

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २३७ मुलं बाधीत झाले आहेत. ही आकडेवारी अर्थातच ० ते १२ वयोगटातील आहे. अगदी दीड वर्षाचा मुलालाही कोरोना झालेला आहे. या सर्वच मुलांनी कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने कुणाचाही यात बळी गेलेला नाही.

 

  • १५४ बालिका बाधीत

बाधीत बालकांमध्ये एकुण १५४ मुली बाधीत झाल्या आहेत. त्यात दोन वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. सर्व बाधीत बालिकांनी कोरोनावर मात केलेली आहे. एकुण दोन हजार ३०२ महिला बाधीत झाल्या होत्या. त्यात बालिकांचे प्रमाण ६.५६ टक्के राहिले.

  • जी बालकं कोरोना बाधीत झाली ती एकतर आपल्या बाधीत आई किंवा वडिलांच्या संपर्कात आलेली होती. सध्या शाळा बंद असल्याने त्यांना बाहेरून बाधा होण्याचा संभव नाही. त्यामुळे बालकांना अद्यापही बाहेर सार्वजनिक ठिकाणी काढणे म्हणजे मोठे जिकरीचे ठरणार आहे.

बालकांना सार्वजनिक ठिकाणी नेऊ नये. बालकांची प्रतिकारशक्ती कमी राहत असल्याने त्यांना मल्टीव्हीटॅमिन असलेले पदार्थ खाऊ घालावे. घरात कुणी आजारी असल्यास त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवावे. आजार व्यक्तींजवळ जाऊ देऊ नये. वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी.-डॉ.अरविंद पाटील,बालरोग तज्ज्ञ. नंदुरबार.