शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामांची गुणवत्ता स्वतंत्र संस्थेमार्फत तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीमार्फत गेल्या दहा वर्षात करण्यात आलेल्या कामांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा नियोजन समितीमार्फत गेल्या दहा वर्षात करण्यात आलेल्या कामांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. शिवाय कामांची गुणवत्ता स्वतंत्र एजन्सीमार्फत तपासण्याचा निर्णय जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक घेण्यात आली. आमदार उदेसिंग पाडवी, सुरुपसिंग नाईक, डॉ.विजयकुमार गावीत, चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणा:या विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, नंदुरबारात चांगल्या दर्जाचे ओपन जीम आणि सायन्स पार्क उभारण्यासाठी  आराखडा तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा केंद्रस्थानी ठेऊन आरोग्य केंद्रात चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात. प्रमुख शहरात सीसीटीव्ही बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. लष्करी अळीपासून संरक्षणासाठी शेतक:यांना वेळेत मदत करावी. नवे बंधारे तयार करण्याबरोबरच बंधारे दुरुस्तीला प्राधान्य देण्यात यावे. ग्रामपंचायतींची इमारत, अमरधाम आणि रस्ते या क्रमाने ग्रामपंचायतींना विकासासाठी निधी देण्यात यावा. आश्रमशाळेतील विद्याथ्र्यांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. गमन पॉईंट येथे पर्यटन विकासाची कामे लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा रुग्णालयात मॉडेल ऑपरेशन थिएटर बनविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि साहित्य खरेदी लवकर करावी,असेही त्यांनी सांगितले.यावेळी विविध यंत्रणांमार्फत तयार करण्यात आलेल्या आराखडय़ावर झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या विकासाला जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून चालना देण्यात येणार आहे. प्रत्येक गावाला फूटबॉल, व्हॉलीबॉल आणि क्रिकेटचे साहित्य देण्यात यावे. या तीन खेळांवर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. नव्याने तयार झालेले क्रिडा संकुल तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरीत करण्यात यावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.