शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार मार्गावरील रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. या वेळापत्रकात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. या वेळापत्रकात ‘नंदुरबार-उधना-मेमू’ आणि ‘उधना-पाळधी-मेमू’ या रेल्वेगाडय़ांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.रेल्वेचे नवीन वार्षिक वेळापत्रक जाहीर झाले असून अनेक रेल्वे गाडय़ांच्या वेळेत बदल झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पित झालेली नंदुरबार-उधना मेमू दुपारी दीड वाजता सुटायची. त्यापाठोपाठ भुसावळ-सुरत पॅसेंजर अडीच वाजता नंदुरबारहून सुटायची. त्यामुळे मेमू ट्रेन रिकामीच धावत होती. परंतु आता मेमू ट्रेन साडेतीन तास अगोदर म्हणजेच सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी नंदुरबारहून सुटणार आहे. त्यामुळे उधना जाणा:या प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे उधना-पाळधी मेमू दुपारी दोन वाजून 35 मिनीटांनी नंदुरबार स्टेशनवर येत होती. त्याचवेळेस भुसावळ-सुरत पॅसेंजर स्टेशनवर उभी असायची. एकाचवेळेस दोन  पॅसेंजर ट्रेन स्टेशनवर असल्यामुळे मेमू ट्रेन रिकामीच धावत होती. परंतु नवीन वेळापत्रकानुसार उधना-पाळधी  मेमू दुपारी चार वाजता नंदुरबार स्टेशनवर येऊन चार वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासाला मेमू ट्रेन रात्री साडेबाराऐवजी रात्री एक वाजता नंदुरबारहून सुटणार आहे.याव्यतिरीक्त अहमदाबाद-इलाहाबाद एक्सप्रेस रात्री साडेआठ वाजता नंदुरबार स्टेशनवर येऊन रात्री आठ चाळीसला सुटत होती. त्याऐवजी आता नऊ पस्तीसला येऊन पावणेदहा वाजता सुटणार आहे. उधना-जयनगर अंत्योदय एक्सप्रेस सकाळी अकरा चाळीसऐवजी दुपारी सव्वा बाराला नंदुरबारहून सुटेल. अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस दुपारी दोन बावीसला सुटत होती. त्याऐवजी आता दोन वाजून 12 मिनीटांनी नंदुरबारहून सुटणार आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजर रात्री नऊ पस्तीसला सुटत होती त्याऐवजी आता नऊ पंचवीसला सुटणार आहे. राजकोट-रिवा एक्सप्रेस रात्री बारा पस्तीसला सुटत होती त्याऐवजी रात्री एक दहाला नंदुरबार स्टेशनवरून सुटेल.अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, ओखा-पुरी एक्सप्रेस आणि अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस वेगवेगळ्या दिवसांना रात्री एक वाजून वीस मिनिटांनी सुटत होत्या त्याऐवजी आता रात्री पावणे दोन वाजता सुटणार आहे. उधना-वाराणसी एक्सप्रेस रात्री बारा चाळीसला नंदुरबारहून सुटत होती त्याऐवजी आता रात्री एक वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. वलसाड-मुज्जफरपूर एक्सप्रेस आणि वलसाड-कानपूर एक्सप्रेस रात्री बारा चाळीसला सुटत होती त्याऐवजी रात्री बारा वाजून 55 मिनीटांनी सुटणार आहे.