शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पेट्रोल व डिङोलवरील सेस रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दोन उड्डाण पुलांवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने लावलेला पेट्रोल व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील दोन उड्डाण पुलांवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने लावलेला पेट्रोल व डिङोलरवरचा सेस 1 जानेवारीपासून रद्द करण्यात येणार आहे. याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानपरिषदेत सोमवारी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. यामुळे गेल्या 15 वर्षानंतर शहरवासीयांची सेसमधून सुटका होणार आहे.नंदुरबारातील दोन उड्डाणपुलांसाठी रस्ते विकास महामंडळाने 22 कोटी रुपये खर्च झाला होता. त्यातील काही निधी आदिवासी विकास महामंडळाने दिला होता. उर्वरित खर्च वसुलीसाठी महामंडळाने आधी काही वर्ष शहरात सहा ठिकाणी टोलनाके लावले होते. ते रद्द झाल्यानंतर पेट्रोल व डिङोलवर अनुक्रमे एक व दोन रुपये सेस लावला होता. वेळोवेळी सेसची मुदत वाढविण्यात आली होती. शासनाने हा सेस रद्द करावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यापूर्वी देखील विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु अर्थ खात्याने डिसेंबर 2019 र्पयत मुदतवाढ दिल्याने मध्येच तो बंद करता येणार नसल्याचे सांगितले होते. आता डिसेंबरला मुदत संपल्यानंतर सेसची मुदत 1 जानेवारीपासून वाढवू नये अशी मागणी आमदार रघुवंशी यांनी सोमवारी केली. आमदार रघुवंशी यांच्या प्रश्नावर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी डिसेंबर 2019 नंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे जानेवारी 2020 पासून नंदुरबारात पेट्रोल व डिङोल अनुक्रमे दोन व एक रुपये स्वस्त होणार आहे.प्रवासी संघटनेचा दावादरम्यान, सेस रद्द व्हावा यासाठी प्रवासी संघटनेने देखील वेळोवेळी आंदोलने केली होती. लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर धरणे धरून काळे ङोंडे लावले होते. संघटनेच्या संघर्षाला यश आल्याचे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी सांगितले.