शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ११० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध पाणी योजना आणि जलस्त्रोतांच्या जलनमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात येते. गेल्या वर्षातील संकलित करण्यात ...

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध पाणी योजना आणि जलस्त्रोतांच्या जलनमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात येते. गेल्या वर्षातील संकलित करण्यात आलेल्या सुमारे आठ हजार नमुन्यांपैकी ६०० नमुने हे दूषित असून हे नमुने ११० गावांमधून संकलित केले गेले आहेत.

दूषित असलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने गावोगावी नियुक्त केलेले मल्टीपल हेल्थ वर्कर अर्थात एमपीडब्ल्यू या पाणी नमुन्यांचे संकलन करत आहेत. त्यांच्याकडून हातपंप, पाणी योजना, विहिरी, सार्वजनिक नळ या ठिकाणांहून हे नमुने संकलित करून ते जिल्हा प्रयोगशाळेत आणले जातात. याठिकाणी त्याची तपासणी करून ते पिण्यायोग्य किंवा अयोग्य याचा अहवाल देत, ग्रामपंचायतींना सूचित केले जात आहे. यातून त्या-त्या गावांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात क्षारयुक्त, फ्लोराईडयुक्त तसेच इतर द्रव असलेले पाणी अजिबात नसल्याचा दावा केला जातो. परंतु, जलजन्य आजार पसरवणारे दूषित नमुने मात्र आढळून येत असल्याने त्याठिकाणी उपाय केले जात असल्याचे सांगितले गेले आहे. हे नमुने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात गोळा केले जात आहेत. जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक दीड हजार पाणी नमुने हे नवापूर तालुक्यातून गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. यातील १० टक्के नमुने हे दूषित आहेत.

सर्वच ग्रामपंचायतींमधून नमुन्यांचे संकलन

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात जिल्ह्यातून हे पाणी नमुने संकलित करण्यात आले आहेत. नमुन्यांमध्ये दूषितपणा हा १०० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात बहुतांश सर्वच गावांचे पाणी नमुने तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे. तालुक्यात यंदा जलजन्य आजाराची एकही घटना नसल्याचा दावाही आरोग्य विभागाचा आहे.

जिल्ह्यात पाणी योजनांचे पाईप हे वर्षानुवर्ष जुनाट आहेत. यामुळे काही गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजनाच निकामी असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १० ते १५ हजारपेक्षा अधिक पाणी नमुने तपासणी करून त्याचा अहवाल दिला जातो. परंतु गेल्या वर्षापासून आलेला कोरोना या कामांना ब्रेक लावत आहे.गेल्या वर्षातील मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात केवळ हजार नमुने संकलित करून तपासणी केली होती. सर्व सहा तालुक्यांतून प्रत्येक महिन्याला हजारापेक्षा कमीच नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती आहे.

पावसाळ्यात जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे अतिसार, जुलाब, डायरिया तसेच पोटाचे विकार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नमुने तपासून त्याचा अहवाल देण्यावर भर दिला जातो. यातून पुढील उपाययोजनांसाठी आरोग्य विभाग लेखी आदेश काढत आहे.

जिल्ह्यात ५८६ ग्रामपंचायती, चार नगरपालिका व एक नगरपंचायत हद्दीतील विविध जलस्त्रोतांची माहिती संकलित केली गेली आहे. ज्या ठिकाणचे नमुने दूषित आहेत त्याठिकाणी आरोग्य विभागाचे पथक भेट देत उपाययोजनांना गती देत असल्याची माहिती देण्यात आली.

आजारी पडायचे नसले तर पाणी उकळून प्या

n दरम्यान, आरोग्य विभागाकडून जलजन्य आजारांपासून नागरिकांना स्वत:चा बचाव करता यावा यासाठी मार्गदर्शन केले जाते.

n यात प्रामुख्याने पाणी उकळून पिणे हा सल्ला असतो.

n तसेच पिण्याच्या पाण्यात जंतुनाशकाचा नियमित वापर करणे, पिण्याचा पाण्याचा माठ किंवा इतर तत्सम साहित्य स्वच्छ जागी ठेवावे, पाणी घेण्यासाठी स्वच्छ भांड्यांचा वापर करावा.