शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागाचा गाडा रिक्त पदांमुळे अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केल्या. संबधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. दरम्यान, वित्त विभागात तब्बल १५ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन झाली. सभेत आरोग्य व शिक्षणावर चर्चा करण्यात आली. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती निर्मला राऊत, रतन पाडवी, सदस्य देवमन पवार, मधुकर नाईक, विजय पराडके, धनराज पाटील, सी.के.पाडवी आदी सहभागी झाले होते. बैठकीत वित्त विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. ठराविक मर्जीतल्या लोकांकडे महत्वाचे टेबल आहेत. कामे लवकर होत नाहीत, मनमानी कारभार चालविला जातो त्यामुळे या विभागाला शिस्त लावावी अशी मागणी देखील यावेळी सदस्य सी.के.पाडवी व इतर सदस्यांनी केली. त्यावर वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांनी सांगितले, वित्त विभागात एकुण २९ पदे मंजुर आहेत. त्यातील केवळ १४ पदे भरलेली असून १५ पदे रिक्त आहेत. त्यात कर्मचारी रजा व इतर बाबी लक्षात घेता कमी कर्मचाऱ्यांवरच कामाचा गाडा चालविला जात आहे. त्यामुळे काही कामांबाबत विलंब होऊ शकतो असे स्पष्टीकरण दिले. अध्यक्षा वळवी यांनी याबाबत गांभिर्याने घ्यावे व महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे अशा सुचना दिल्या.दुर्गम भागात ठेकेदारांकडून कमी दराने अर्थात अगदी २५ ते ३० टक्के कमी दराने कामे घेतली जात आहेत. याचा अर्थ या कामांचा दर्जा काय असू शकतो याचा अंदाज येतो. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत काहीही तडजोड होता कामा नये. या ठिकाणी संबधीत विभागांनी लक्ष द्यावे अशी मागणी सी.के.पाडवी, विजय पराडके यांनी केली. त्यावर सीईओ रौंदळ यांनी सांगितले, इतक्या कमी दराने कामे घेणे चुकीचे आहे. कामांच्या दर्जाबाबतची हमी बांधकाम विभागाने द्यावी तरच पुढील प्रक्रिया राबवावी अशा सुचना दिल्या. अंगणवाडी, मिनीअंगणवाडीतील सेविका व मदतनीस नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवार महिला असावी अशी अट आहे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पराडके यांनी केली. आरोग्य विभागातील ३२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याची पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. मधुकर नाईक यांनी अधिकारी भेटत नसल्याची तक्रार नागरिक करीत असल्याचे सांगितले.