शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या दुर्गम भागाला अखेर मंत्रीमंडळात मिळाले प्रतिनिधीत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:22 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १९६७ पासून सतत मंत्रीपद मिळणाऱ्या नंदुरबारला पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. यावेळी सातपुड्याच्या दुर्गम भागाचे प्रतिनिधीत्व करणाºया आमदारांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि सतत सात वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला आहे.संयुक्त धुळे जिल्हा असतांना नंदुरबार विभागाला नेहमीच मंत्रीपद मिळाले आहे. थेट डी.एन.पाडवी यांच्यापासून आतापर्यंत अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश करता येईल. या नेत्यांनी आपल्या परीने परिसराच्या विकासाला चालना दिली आहे.सतत मंत्रीपदाचा माननंदुरबार विभागाला सतत अर्थात १९६७ पासून उपमंत्री, राज्यमंत्री ते कॅबीनेट मंत्रीपदाचा मान मिळत गेला आहे. तळोदा मतदार संघातून निवडून गेलेले डी.एन.पाडवी यांना तेंव्हाच्या सरकारमध्ये उपमंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर दिलवरसिंग पाडवी यांना राज्यमंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात नंदुरबार मतदारसंघातून निवडून आलेले आर.पी.वळवी यांना काही काळ राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतरच्या काळात मात्र सातत्याने जिल्ह्याला नवापूर मतदार संघातून कॅबीनेट मंत्रीपद मिळत गेले ते सुरूपिसंग नाईक यांच्या रुपाने. सतत २० वर्ष ते कॅबीनेट मंत्री म्हणून राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये नंदुरबारातून निवडून आलेले आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी युतीच्या काळात पाच वर्ष राज्यमंत्रीपद मिळविले. नंतर आघाडीच्या तीन सरकारांमध्ये ते कॅबीनेटमंत्री राहिले.आघाडीच्या सत्तेच्या काळात अर्थात १९९९ ते २०१४ पर्यंत जिल्ह्याला दोन कॅबीनेट मंत्री मिळत होते. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. केंद्रीय राजकारणात भाजपने मुसंडी मारली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेझ निर्माण झाल्यानंतर अनेकांनी पक्षांतर केले. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनीही आघाडीच्या सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा देत कन्येला भाजपमध्ये प्रवेश देत कन्या डॉ.हिना गावीत यांना लोकसभेत निवडून आणले. विधानसभेत ते स्वत: भाजपकडून निवडून आले. परंतू तेंव्हापासून अर्थात गेल्या पंचवार्षीकमध्ये भाजप सत्तेच्या काळात नंदुरबार मंत्रीपदापासून उपेक्षीत राहिले.पाच वर्ष उपेक्षाचभाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ता काळात जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकले नाही. जिल्ह्यातून भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी हे दोन आमदार निवडून गेले होते. दरवेळी मंत्री मंडळाच्या विस्तारावेळी जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल म्हणून चर्चा होत होती. परंतु पुर्ण पाच वर्ष जिल्हा मंत्रीपदाविनाच राहिला.दुर्गम भागाला न्यायसतत सात वेळा निवडून येण्याचा मान मिळविणारे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना यावेळी काँग्रेसने मंत्रीपदाचा मान दिला. ते निवडून येत असलेला मतदारसंघ अर्थात अक्कलकुवा व धडगाव तालुका पुर्ण डोंगराळ, दुर्गम व अविकसीत आहे. त्यामुळे एका अर्थाने अ‍ॅड.पाडवी यांच्या माध्यमातून दुर्गम भागाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.काँग्रेस पक्षात आजच्या परिस्थितीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा समावेश होतो. यावेळी त्यांना उमेदवार निवडीच्या कोअर कमिटीत स्थान होते. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चांमधील प्रमुख नेत्यांमध्ये देखील आमदार अ‍ॅड.पाडवी यांचा समावेश होता. मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव काँग्रेसतर्फे सतत वरच्या क्रमांकावरच घेतले जात होते.