शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

नंदुरबारात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:32 IST

टंचाई : टँकर व जार पुरवठा करणाऱ्यांना मागणी

नंदुरबार : पाणी टंचाईची तीव्रता जशी वाढत आहे तसे पाणी विक्री करणाऱ्यांचे देखील फावत आहे. विशेषत: टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्यांना मोठी मागणी वाढली आहे. सध्या पाच हजार लिटरचे टँकर पाचशे रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. शुद्ध आणि गार पाण्याचे जार पुरविणाºयांकडेही मागणी वाढली आहे.नंदुरबार शहरालगत परंतु नगरपालिका हद्दीत नसलेल्या अनेक नवीन वसाहतींमध्ये तसेच लगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. कुपनलिका, विहिरी कोरड्या झाल्या आहेत. काही कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि पाण्याचा स्त्रोतच नसल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी देखील अशा कुपनलिकांना येवू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी टँकरने पाणी पुरवठा करणाºयांचे चांगलेच फावले आहे. नंदुरबार शहर आणि लगतच्या परिसरात दररोज किमान ५० पेक्षा जास्त खाजगी टँकरच्या फेºया होत असल्याचे एका टँकर चालकाने सांगितले.५०० रुपये दरएका टँकरला अर्थात पाच हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरसाठी किमान ५०० रुपये मोजावेल लागत आहे. येत्या काळात मागणी वाढल्यानंतर त्यात काहीअंशी वाढ करण्याचे सुतोवाच टँकर चालक, मालक यांनी व्यक्त केली आहे. पाच हजार लिटर पाणी साठवण्याची सोय नसलेले नागरिक दोन किंवा तीनजण मिळून एक टँकर पाणी मागवत आहेत. महिन्याला विकतच्या पाण्यासाठी किमान तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहे. पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरमध्ये पुर्ण क्षमतेचे पाणी असतेच असे नाही. वाहतूक करतांना काही प्रमाणात पाणी वाया जात असतेच.फिल्टर प्लान्ट चालकही तेजीतफिल्टर पाणी जार पुरवठा करणाºयांचाही धंदा सध्या चांगलाच तेजीत आला आहे. गेल्या महिनाभरापासून मागणी वाढली असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सांगितले. नियमित ग्राहकांसह ज्यांच्या घरी कार्यक्रम, लग्न सोहळा आहे अशा ठिकाणी अतिरिक्त जार पुरवावे लागत आहेत. सध्या २० रुपये प्रतीनग जार अशा पद्धतीने पुरवठा केला जात आहे. सर्वच विक्रेत्यांची सेवा ही घरपोच आहे. १०० पेक्षा अधीक जारची मागणी असेल तर दरात सूट दिली जात आहे. नंदुरबारात गेल्या दोन वर्षात फिल्टर प्लान्टची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.पालिकेचे मशीन बंदपालिकेने पाच ते सहा ठिकाणच्या चौकात फिल्टर पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पाच रुपयाच्या कॉईन टाकल्यावर पाच लिटर पाणी मिळविण्याची सोय त्यात आहे. अनेकांनी ते सोयीचे ठरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यातील अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत. सरू करण्याची मागणी आहे.शहरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली असतांना पालिकेने शहरालगतच्या काही वसाहतींसाठी संबधीत ग्रामपंचायतींना मिटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ज्या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठ्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही अशा ठिकाणीच पालिकेने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात शहरवासीयांच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही असे पालिकेने स्पष्ट केले आहे.