शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बसेस आणि रेल्वेस्थानकातील गाडय़ा ‘स्टँडबाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे प्रथमच रेल्वे आणि महामंडळाच्या बसेस एवढय़ा दीर्घ कालावधीसाठी बंद आहेत़ या काळात त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे प्रथमच रेल्वे आणि महामंडळाच्या बसेस एवढय़ा दीर्घ कालावधीसाठी बंद आहेत़ या काळात त्यांची स्वच्छता करण्यासह दैनंदिन पाहणी करुन सर्वच गाडय़ा सज्ज ठेवण्यात आल्याचे रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आल़े एसटी महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातील प्रत्येकी 20 बसेस ह्या अत्यावश्यक  सेवेसाठी सज्ज ठेवल्या आहेत़ गर्दी होऊन कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने रेल्वेची सर्वच कामे बंद करण्यात आली आहेत़ प्रवासी गाडय़ा बंद असल्या तरी कोळसा, धान्य, फळे, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणा:या मालगाडय़ा धावत आहेत़ या पाश्र्वभूमीवर गँगमन, ट्रॅकमन आणि अधिकारी हे नियमित कामकाज करत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आल़े नवापुर ते दोंडाईचा दरम्यान नियमित ट्रॅक तपासणी, गेटची पाहणी व इतर कामांवर भर दिला जात आह़े मजूर आणि कर्मचा:यांची गर्दी टाळली जावी म्हणून रेल्वेकडून सुरु असलेली बांधकामेही बंद ठेवण्यात आली आहेत़ केंद्र शासनाकडून आदेश आल्यानंतरच रेल्वे सुरु होणार असली तरीही अत्यावश्यक वेळेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आल़े दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या शहादा, नंदुरबार, नवापुर आणि अक्कलकुवा आगारात पूर्णपणे शुकशुकाट आह़े प्रत्येक आगारात बसेस लावून ठेवण्यात आल्या आहेत़ बसेस यापूर्वीच स्वच्छ करण्यात आल्या असल्याने त्यांची दैनंदिन स्वच्छता करणे थांबवण्यात आले आह़े यंत्रशाळांमध्ये कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येणे शक्य असल्याने त्यांना सुटी देण्यात आली आह़े शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक आगारात 20 गाडय़ा ह्या सज्ज ठेवण्यात आल्या असून त्यासाठीचे चालक-वाहकही तयार ठेवण्यात आले आहेत़ परंतू अद्याप या गाडय़ांना बाहेर काढण्याची गरज पडलेली नसल्याने नियुक्त चालक वाहक केवळ हजेरी लावून परत जात आहेत़ नंदुरबारसह इतर चारही आगारांचे सरासरी 30 लाख रुपयांचे नुकसान दर दिवशी होत आह़े परंतू येत्या काळात बसेस पुन्हा सुरु झाल्यास नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आल़े  उन्हाळ्यात यात्रा, सुटय़ा, लगAसराई यामुळे बसेसमध्ये प्रवासी वाढून उत्पन्न वाढीवर भर दिला जात होता़ परंतू लॉकडाऊनमुळे या उत्पन्नावर यंदा पाणी फेरले गेले आह़े