शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ शहादा व नंदुरबार शहरात घडलेल्या या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ शहादा व नंदुरबार शहरात घडलेल्या या घटनेदरम्यान चोरटय़ांनी रोख रक्कम चोरुन नेली़ नंदुरबारशहरातील नवनाथनगर भागातील शाळा क्रमांक 9 मागे राहणारे जयेश पांडुरंग मोरे यांच्या घरातून 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरटय़ाने 95 हजार रुपये रोख चोरुन नेल़े 20 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली़ चोरटय़ांनी मोरे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट फोडत त्यातील रक्कम चोरुन नेली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली होती़ याबाबत जयेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक दिवटे करत आहेत़शहादाशहरातील जुना प्रकाशा रोडवरील डॉ़ योगेश पुरुषोत्तम चौधरी यांच्या मातोश्री क्लिनिक या दवाखान्यातून अज्ञात चोरटय़ांनी 98 हजार 200 रुपये चोरुन नेल़े 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता चोरीची घटना उजेडात आली़ चोरटय़ांनी दवाखान्याच्या मागील खिडकीचा गज वाकवून आत प्रवेश करत टेबलच्या खालचा ड्रॉवर फोडून रक्कम लांबवली़ याबाबत डॉ़ योगेश चौधरी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख करत आहेत़ पोलीस निरीक्षक नजन यांनी भेट देत पाहणी केली होती़