शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

देवळफळीत तलवार व गुप्तीने वार करीत दोघांना केले जखमी; दोन संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील देवळफळी भागात राहत्या घराच्या मालकी हक्कावरून दोन गटांत हाणामारी झाली. यासंदर्भात तुकाराम ...

नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील देवळफळी भागात राहत्या घराच्या मालकी हक्कावरून दोन गटांत हाणामारी झाली. यासंदर्भात तुकाराम मंगा कोकणी, वय 50 यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रदीप शामुवेल कुवर, तुकाराम गिरधर वसावे, दोघे रा. देवळफळी, नवापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तुकाराम मंगा कोकणी, वय 50, राकेश मंगा कोकणी, वय 29, दोघे रा. पंपहाऊस, देवळफळी, नवापूर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तुकाराम मंगा कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लोखंडी तलवार, पँटच्या खिशात गुप्ती घेऊन प्रदीप कुवर याने घरात अनधिकृत प्रवेश करून तुम्ही हे घर सोडून द्या नाही तर तुम्हाला सर्वांना मी मारून टाकीन अशी धमकी देत दुखापत करून शिवीगाळ केली. घराबाहेर अंगणात येऊन तुकाराम गिरधर वसावे याने प्रदीप कुवरला सांगितले की, तू यांना मारून टाक, मी तुझा बाजूने कोर्टात केस चालवील व तुला निर्दोष सोडून आणील, अशी चिथावणी दिल्याने प्रदीप कुवर पोटावर, हातावर सशस्त्र हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद दिली असून, नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 452, 323, 504, 506, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25

प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धीरज महाजन करीत आहेत.