शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बोरद गाव २२ एप्रिलपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

तळोदा तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या बोरद येथे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू ...

तळोदा तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या बोरद येथे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनामार्फत कठोर पावले उचलण्यात येत आहेत. तळोदा उपविभागीय दंडाधिकारी तथा घटना व्यवस्थापक शाहूराज मोरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना ८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते २२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तापमानाची नोंद घेऊन, विशेष पथकाद्वारे घरोघरी सर्वेक्षण करून आदेशाचे दिवसापासून शक्यतोवर तीन दिवसांत सर्व संशयित रुग्णांचा शोध घेण्यात यावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संशयितांची तपासणी नमुने घेण्यात यावेत. प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची राहील. प्रतिबंधित क्षेत्रात उक्त कालावधीत जमावबंदी लागू करण्यात येत असून सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक किंवा इतर सर्व सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंधित राहील. सनियंत्रण अधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याकरिता सशुल्क सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रतिबंधित क्षेत्राकरिता पोलीस निरीक्षक तळोदा पोलीस ठाणे यांनी योग्य तो बंदोबस्त लावावा. आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता सनियंत्रण अधिकारी म्हणून तळोदा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सोनवणे यांची नियुक्ती केली आहे तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून तर सहायक सनियंत्रण अधिकारी म्हणून बोरद ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.