शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

सहा महामार्ग देतील जिल्ह्याला ‘बुस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नव्या वर्षात जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले सात महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूकीसाठी सज्ज होण्याची शक्यता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नव्या वर्षात जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले सात महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूकीसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे़ यातील तीन मार्गांची रखडलेली कामे नव्या वर्षात सुरु होणार असून उर्वरित तीन मार्गांसाठी शासनाकडून निधी मिळण्याची शक्यता आहे़राज्याच्या एका टोकाला असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो़ रेल्वे मार्गामुळे देशपटलावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून काही वर्षांपूर्वी केवळ सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हाच जात होता़ कालांतराने शासनाकडून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी पाच राष्ट्रीय महामार्गांची घोषणा करण्यात आली़ तूर्तास यातील तीन महामार्गाची कामे मंजूर आहेत़ काही महिन्यांपासून बंद असलेल्या महामार्ग चौपदरीकरण आणि विस्तारीकरणास सुरुवात होणार आहे़जिल्हा विकासात मोलाचे योगदान नवापुर तालुक्यातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने दिले आहे़ तब्बल ५३ किलोमीटर अंतर जिल्ह्यातून असलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण नव्याने सुरु होणार आहे़ यासाठी रस्ते व जहाजबांधणी मंत्रालयाने निधी व नवीन ठेकेदार यांची नियुक्ती केल्याची माहिती असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंदाच्या वर्षात तशी घोषणा करुन कामाला सुरुवात करणार आहे़यंदाच्या वर्षात शेवाळीफाटा ते गुजरातमधील नेत्रंग तसेच विसरवाडी ते सेंधवा या महामार्गांचे रखडलेले काम पुन्हा वेगात सुरु होणार आहे़ सोबत प्रस्तावित असलेल्या सोलापूर-धडगाव आणि धरणगाव ते धानोरा अर्थात गुजरातहद्दर्पयतचा राज्यमार्गांचे विस्तारीकरणही नव्याने सुरु होणार आहे़ विसरवाडी ते सेंधवा हा महामार्ग विसरवाडी येथून नागपूर-सुरत महामागार्पासून निघालेला आहे़ सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामागार्ला हा महामार्ग जोडला जाणारी याची लांबी १७० किलोमीटर आहे़ नंदुरबार जिल्ह्यात या महामार्गाची लांबी ही ११० किलोमीटर आहे़ विसरवाडी ते कोळदा व कोळदा ते खेतिया अशा दोन टप्प्यात दोन वर्षापासून कामाला वेग आला आहे़विसरवाडी ते सेंधवा महामार्गामुळे तापी व गोमाई नदीवर अनुक्रमे प्रकाशा आणि लोणखेडा येथे तर नेंत्रग ते शेवाळी महामार्गावर हातोडा येथे नवीन पुलाची उभारणी सुरु होऊन कामही पूर्ण होणार आहे़या महामार्गांमुळे नंदुरबार शहर राष्ट्रीय पटलावर येणार आहे़ या रस्त्यावर नंदुरबारच्या रिंग रोाड प्रस्तावीत आहे़ खामगाव ते वाघोदा शिवार व पातोंडा यामार्गाने तो मंजूर होऊ शकतो़