शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘सातपुड्या’चे बॉयलर अग्निप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या ४६ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ कारखाना सार्ईटवर चेअरमन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या ४६ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ कारखाना सार्ईटवर चेअरमन दीपक पाटील व जिल्हा परिषद सभापती जयश्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. सातपुडा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी १८ हजार ४१३ एकर उसाची नोंदणी केली असून कारखान्याच्या गाळप हंगामात पाच लाख ५० हजार मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती दीपक पाटील यांनी दिली.अध्यक्षस्थानी कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील होत्या. कार्यक्रमास खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, रवींद्र राऊळ, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, नगरसेवक नाना निकम, माजी नगरसेवक के.डी. पाटील, विजय दामू पाटील, एकनाथ नाईक, संजय चौधरी, माधवी पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक उपस्थित होते.या वेळी दीपक पाटील म्हणाले की, अडचणी भरपूर असल्या तरी कारखाना सुस्थितीत सुरु राहणार आहे. कारखाना शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यालाच ऊस दिला पाहिजे. रिकाम्या लोकांच्या नादी न लागता कारखान्यासोबत रहावे. कारखान्याबाबत वेडेवाकडे बोलणाºयांचे ऐकून घेऊ नका. कारखाना मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. अडचणीतून मार्ग काढीत कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कर्मचाºयांनी परिश्रम घेत कारखान्याची घोडदौड सुरु ठेवली आहे. जगासोबत चालायचे असेल तर कारखान्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारीत यंत्रांचा वापर करावा लागणार आहे.आम्ही कधीही शेतकºयांना अडविले नाही. परंतु काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पारदर्शक कारभाराचे धडे आम्हाला स्व.पी.के. अण्णांनी दिले असून त्याच पद्धतीने सर्व कारभार सुरु आहे. सातपुडा कारखाना हा शेतकºयांचा आहे. इतर कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा हक्काच्या सातपुडा कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्तविकात कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, शाश्वत पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जात असून १९ हजार एकर ऊसाची लागवड झाली आहे. साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट कोसळले तरी कामगारांना वेळेवर वेतन देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. गळीत हंगामाची परवानगी शासनाने दिली असून महिनाअखेर हंगाम सुरु करण्याचा कारखान्याचा प्रयत्न राहील. विना थांबता हंगाम पार पाडण्यासाठी कामगारांनी प्रयत्न करावे. पुढील गाळप हंगाम १६० दिवस चालेल. कारखाना सुस्थितीत असून पूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहे यात शंका बाळगू नये. गळीत हंगाम चांगला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारखान्याने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा कारखाना जास्तीचे गाळप करेल यासाठी कारखान्याचे सर्वच अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रवीण पाटील यांनी मानले.