शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातही बोगस दारूचा कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात नंदुरबारात बोगस दारूचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी वेळोवेळच्या कारवाईत ते उघड झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात नंदुरबारात बोगस दारूचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी वेळोवेळच्या कारवाईत ते उघड झाले आहे. तळीरामांची वाढती मागणी लक्षात घेता नंदुरबारात एकाने बोगस दारू निर्मितीला सुरुवात केली. पोलिसांच्या धाडीत कारखाना उध्वस्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.पंकज नामदेव चौधरी, रा.साक्रीनाका, नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार फरार आहेत.लॉकडाऊनमुळे तळीरामांची पंचायत झाली आहे. वाटेल तेथून दारू मिळविण्यासाठी तळीराम प्रयत्नशील आहेत. हीच संधी साधत बोगस दारू बनविणे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या माध्यमातून होणारी हजारो रुपयांची कमाई लक्षात घेता नंदुरबारात देखील बोगस दारू बनविणारे सक्रीय झाले आहेत. पैकी एक कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरातील दसेरा मैदान परिसरातील एका गोडावूनमध्ये बोगस दारू तयार केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. शहर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी अचानक धाड टाकली असता त्यात तब्बल ९५ हजार ३२० रुपयांचे बोगस दारू तयार करण्याचे साहित्य मिळाले. त्यात २३० लिटर स्पिरीट, १६ ट्रम, १०५ मॅकडोल दारूच्या बाटल्या, २ इर्न्व्टर, बूच पॅक करण्याचे मशीन, २५ ट्रे, ५०० खाली बाटल्या, एक हजार बूच व इतर साहित्य यांचा समावेश आहे. याच ठिकाणी पाच लाखाची कार देखील मिळून आली ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे.याबाबत फौजदार प्रवीण पाटील यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बिºहाडे करीत आहे.दरम्यान, दारूचा कारखाना चालविणाºया पंकज चौधरी याला आणखी कुणाची साथ आहे. कुणाच्या आशिर्वादाने तो हे काम करीत होता. फरार झालेले त्याचे साथीदार आणखी कोण? याची कसून चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.