शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

आरती पूजन सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील मोरवड येथे शांतीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संत रामदास महाराज यांच्या प्रतिमेची संपूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील मोरवड येथे शांतीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संत रामदास महाराज यांच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. जिल्ह्याबरोबरच मध्यप्रदेश-गुजरात राज्यातील त्यांच्या हजारो अनुयायांनी आरती पूजन सोहळ्यास हजेरी लावल्याने संपूर्ण परिसर धार्मिक वातावरणाने ढवळून निघाला होता.मोरवड येथील आदिवासी संत रामदास महाराज यांनी समाजामध्ये व्यसनाबाबत जनजागृती करून समाजातील व्यसनाधिनता दूर केली होती. ते 1960 साली स्वर्गवासी झाले. तेव्हापासून दरवर्षी त्यांच्या शिष्याकडून ‘शांती दिन’ साजरा करण्यात येत असतो. यंदाही हा दिवस व आरती पूजन सोहळा करण्यात आला. तत्पूर्वी संत गुलाम महाराज यांच्या मठास्थळी भजन,                रामधून, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपासून            रामदास महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक मठापासून काढण्यात आली. संपूर्ण गावातून वाजत-गाजत मिरवणू काढण्यात आली                 होती. प्रत्येक महिला अनुयायांच्या हातातील आरतीमुळे संपूर्ण               परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता.रात्री 12 वाजेला महाराजांच्या समाधी स्थळी मिरवणुकीचे विसजर्न करण्यात आले. तेथे आरती पूजन करण्यात आले. या वेळी लक्ष्मण महाराज यांनी शिष्यांसमोर महाराजांचा संदेश वाचून दाखविला. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पाटील, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, माजी जिल्हा परिषद सभापती नरहर ठाकरे, आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिरामण पाडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, तळवेचे सरपंच कृष्णा पाडवी, माळद्याचे सरपंच गोपी पावरा, किसन वळवी आदींसह हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.दरम्यान मठपती चंद्रसेन महाराज, जितेंद्र महाराज यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास विविध सव्यावसायिकांनी हजेरी लावली होती. संत गुलाम महाराजाप्रमाणेच रामदास महाराजांनीही आदिवासी समाजामध्ये व्यसनमुक्तीचे कार्य           करून समाजाला योग्य दिशा दाखविली होती. त्यामुळेच           शांतीदिन आजतागायत साजरा केला जात आहे.