शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मंडळाधिका-याला ढंपरचालकाकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  ढंपरमध्ये भरलेल्या वाळूची चाैकशी करणा-या मंडळ अधिका-याला चालकाने धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी रात्री ९ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  ढंपरमध्ये भरलेल्या वाळूची चाैकशी करणा-या मंडळ अधिका-याला चालकाने धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ढंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. नंदुरबार- वाका रस्त्यावर एमएच ४१ एयू ९७१२ या ढंपरमधून वाळू वाहून नेली जात असल्याचे दिसून आल्यानंतर मंडळाधिकारी अनेश जेमू वळवी यांनी त्यास थांबवून चाैकशी करण्याचा प्रयत्न केला. मंडळाधिकारी वळवी हे वाळू बाबत विचारणा करत असल्याचा राग येवून ढंपरचालक दिनेश पोपट सावकार रा. सटाणा याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मंडळा अधिकारी वसावे यांचा हात धरून ओढाताण केली. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा मंडळाधिकारी वळवी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ढंपरचालक दिनेश सावकार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू आहे. नंदुरबार मार्गाने ही वाळू राज्यातील विविध भागात पाठवली जाते. या वाळू वाहतूकीवर जिल्हाधिकारी डाॅ. भारूड यांनी काही काळापूर्वी बंदी घातली होती. परंतू न्यायालयाने ही बंदी अवैध ठरवल्यानंतर ही वाहने पुन्हा जिल्ह्यातील रस्त्यांवरुन धावू लागली आहेत. भरधाव वेगात जाणा-या वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरू असून शासकीय कर्मचा-यांनाही तपासणी करु दिली जात नाही.