शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सुजालपूर येथे ५२ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ ...

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्र मंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने सुजालपूर (ता. नंदुरबार) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे प्रकाश पाटील, दिलीप पाटील, प्रदीप पाटील, किरण पाटील, सुनील पाटील, शरद भील, दिलीप भील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी महिला, पुरुष, तरुणी, तरुण मित्रमंडळीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरात एकूण ५२ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

रक्तदान शिबिरात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलीने सहभाग नोंदवला. गोविंद मदन पाटील, सुरेखा गोविंद पाटील व कन्या भाग्यश्री गोविंद पाटील यांनी रक्तदान केले. शिबिरास अनिल पाटील, मयूर पाटील, मनीष पाटील, गौरव पाटील, भावेश पाटील, भूषण पाटील, भाविक पाटील, पराग पाटील, जयेश पाटील, चंद्रकांत पाटील, प्रतीक पाटील, दीपक पाटील, पंकज पाटील, सरदार वल्लभभाई पटेल गणेश मित्रमंडळाचे सदस्य, गावातील युवती आचल पाटील, नीकिता पाटील, भाग्यश्री पाटील, दिव्या पाटील, रिया पाटील, भूमी पाटील, दिव्या भूपेंद्र पाटील, पूर्वा पाटील, खुशी पाटील, म्हसावद येथील योगेश पाटील, हितेश चौधरी, रोहित पाटील, भगवान पाटील, सरवाळा येथील भावेश पटेल, प्रशांत पटेल, विकास पटेल, सेलवासा लेवा पाटीदार गुजर मंडळाचे विनय पटेल (डामरखेडा), पळाशी येथील डॉ. योगेश पाटील, महेंद्र पाटील, पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन नंदुरबारचे शीतलकुमार पाटील, संजय पाटील, हितेश पाटील, सुदाम पाटील (कोळदा), कोरीटचे मोहित पाटील, धनंजय पाटील, राम पाटील उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणाचा संदेश देत जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती व गावातील युवतींनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘लोकमत’, व्हीसीजीजीएमबरोबरच येथील सरदार वल्लभभाई गणेश मित्र मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक मंडळ, ग्रामस्थ व महिला तसेच शहादा, लोणखेडा, चिखली, चिंचोदा, सरवाळा, म्हसावद, डामरखेडा, पळाशी येथील व्हीएसजीजीएम सदस्य उपस्थित होते.

धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ. सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, उद्धव पाटील, कैलास पटेल, चंद्रकांत दंडगव्हाळ, पांडुरंग गवळी यांचे सहकार्य लाभले.