शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहातील जागेवरून भाजप नगरसेवकांचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी नगरसेवकांचा उल्लेख नाही, बसण्यासाठी खुर्ची नाही असे सांगत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी नगरसेवकांचा उल्लेख नाही, बसण्यासाठी खुर्ची नाही असे सांगत भाजप नगरसेवकांनी कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. यावेळी घोषणा, प्रतीघोषणा झाल्याने काही काळ कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. जिल्हाधिकारी यांनी विरोधी नगरसेवकांना समजवून सांगितले. त्यानंतर त्यांनी बहिष्कार टाकून तेथून निघून गेले. पालिकेच्या विकास कामांच्या भुमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाला. त्यासाठी नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची निर्धारीत वेळेच्या नंतर भाजपचे गटनेते चारूदत्त कळवणकर, नगरसेवक कमल ठाकुर, प्रसाद चौधरी, गौरव चौधरी, आनंद माळी व इतर सभागृहात आले. तोपर्यत सर्व आसन भरले गेले होते. त्यावर आक्षेप घेत कळवणकर यांनी आक्षेप घेतला. चंद्रकांत रघुवंशी यांनी कोरोनाची खबरदारी घेत आसनक्षमता पुर्ण झाली आहे. आपल्याला आसन खाली करून देत आहोत तेथे आपण बसावे असे सांगितले, परंतु विरोधी नगरसेवकांनी जोरजोराने आक्षेप घेणे चालूच ठेवले. त्यावरून रघुवंशी व त्यांच्यात    शाब्दीक वाद झाले. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घोषणा सुरू झाल्या. जिल्हाधिकारी भारूड यांनी नगरसेवकांना समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी माईकवर येऊन हा शासकीय कार्यक्रम आहे. कुणी ऐकत नसल्यास पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे आपले काम करावे अशा सुचना केल्या. त्यानंतर विरोधी नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला व तेथून निघून गेले. त्यानंतर नाट्यगृह परिसरात नगरसेवकांनी घरपट्टी माफ करण्याचे बॅनर झळकवून निषेध व्यक्त केला.