शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

युवतीवर हल्ला करून ठार करणारा बिबटय़ा अखेर झाला जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : पानसेमल व खेतिया परिसरात मागील एक आठवडय़ापासून धुमाकूळ घालणा:या बिबटय़ाला जेरबंद करण्यात मध्य प्रदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : पानसेमल व खेतिया परिसरात मागील एक आठवडय़ापासून धुमाकूळ घालणा:या बिबटय़ाला जेरबंद करण्यात मध्य प्रदेश वनविभागाला यश आले आहे. खेतियापासून नजीक असलेल्या भडगोन, ता.पानसेमल येथे शुक्रवारी रात्री हा बिबटय़ा पिंज:यात कैद झाला. दरम्यान, बिबटय़ा पिंज:यात कैद झाल्याने नागरिकांमधील भीतीचे वातावरण               काही प्रमाणात कमी झाले असून          परिसरात बिबटय़ांचा अजून वावर असल्याची शंका व्यक्त होत असून  त्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठवडाभरापासून पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ाने धुमाकूळ घातला होता. या बिबटय़ाने आठवडाभरात एका युवतीला ठार केले तर तीन जणांना गंभीर जखमी केले होते. या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी मध्य प्रदेश वनविभागाने भडगोन शिवारात पिंजरा ठेवला होता. या पिंज:यात शेळी ठेवलेली होती. शुक्रवारी रात्री बिबटय़ा शिकारीच्या शोधात असताना शेळीची शिकार करण्यासाठी पिंज:यात अडकला आणि कैद झाला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात लक्ष ठेवून होती. बिबटय़ा पिंज:यात कैद झाल्याचे त्यांच्या पहाटे लक्षात आले. या बिबटय़ाला                  खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वरजवळ असलेल्या नर्मदानगर, ता.पुनासा येथील चांदगढच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात  आले. या वेळी सेंधवा वनविभागाचे डीएफओ केशवसिंह पट्टा, एसडीएफओ विजय गुप्ता, उपवनमंडळ अधिकारी एस.एस. नोरके, पानसेमलचे वनपरिक्षेत्र सहायक प्रदीप पवार, पानसेमल वनमंडळ अधिकारी संजय मालवीय, खेतिया वनपरिक्षेत्र सहायक भुरू खान, खेतिया व पानसेमल वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील, अनिल चौहान, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल उपस्थित होते.दरम्यान, खेतिया व परिसरात अजूनही बिबटय़ांचा वावर असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.  वनविभाग बिबटय़ांना जेरबंद करण्यासाठी सज्ज असून  खेतिया व पानसेमल परिसरात किती बिबटे आहेत आणि त्यांचा वावर कुठे आहे यासाठी वनविभाग सतर्क राहून बिबटय़ांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे व ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत.  बिबटय़ाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्यात            प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले  होते. बिबटय़ाला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी खेतिया व पानसेमल परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. त्यादृष्टीने वनविभागाने सतर्क राहून बिबटय़ाला जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांमधील भीती काही प्रमाणात दूर झाली आहे.

या बिबटय़ाने आठवडाभरात खेतिया व पानसेमल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून एका 17 वर्षीय युवतीला ठार करून तीन जणांना गंभीर जखमी केले होते. 23 जुलै रोजी कानसूल, ता.पानसेमल येथील वृद्ध महिला नायडीबाई सायसिंह ही झोपडीत झोपली होती. त्यांच्यावर बिबटय़ाने हल्ला करून जखमी केले आहे. दुसरी घटना 27 जुलै रोजी भडगोन, ता.पानसेमल शिवारात घडली. निंदणीच्या कामासाठी आलेले मजूर सायंकाळी पाच वाजता घरी परत जात असताना उसाच्या शेतातून येत बिबटय़ाने रस्त्याने जाणा:या संगीता विजय आर्य  (17) या युवतीवर बिबटय़ाने मागून येऊन संगीताच्या मानेवर झडप मारून तिला उसाच्या शेतात घेऊन पळाला होता. या घटनेत संगीताचा मृत्यू झाला होता. तिस:या घटनेत 28 जुलै रोजी रात्री आमदा, ता.पानसेमल येथे बिबटय़ाने घराजवळ झोपलेल्या शिवदास पाडवी यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. चौथी घटना 31 जुलै रोजी जुनापानी, ता.पानसेमल येथे घडली. त्यात बरफा रेवा नवरे यांच्यावर बिबटय़ाने हल्ला करून जखमी केले होते. भडगोन शिवारात वनविभागाने ठेवलेल्या पिंज:यात हा बिबटय़ा कैद झाला आहे.