शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची दोन वर्षापासून अक्षरश: चाळण झालेली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची दोन वर्षापासून अक्षरश: चाळण झालेली आहे. बेडकी ते चिंचपाडा या 15 किलोमीटर अंतरात येणा:या तीन पुलांची अत्यंत दयनिय अवस्था झाल्याने अधिकारी महाड सारखी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत की, काय असा प्रश्न उपस्थित होत असून, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या 93 लाख रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम करणा:या कंपनीकडून कामे होत नसल्याने रस्त्याचे अर्धवट काम झाले आहे. त्यामुळे जागो जागी वळण रस्ते करून ठेवले आहेत. महामार्गावरुन होत असलेली अवजड वाहतूक पाहता रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले असल्याने वाहतुकदारांमधून रस्ता दुरुस्तीसाठी दबाव वाढल्याने 93 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक कार्यकत्र्याकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका:यांना रस्त्याची दुर्दशा व होत असलेले अपघात याबाबत अवगत करुन दिले होते. आंदोलनाच्या माध्यमातून व पाठपुरावा केल्याने ब:याच कालावधी नंतर रस्ता दुरुस्तीची सुरुवात करण्यात आली. माती मुरुमाचा भराव व थातुर मातुर अर्धवट दुरुस्ती केल्याने महामार्गावरील नियमित अवजड वाहतुकीमुळे पहिल्याच पावसात रस्त्याची दयनिय अवस्था पूर्ववत झाली आहे. रोजच होणारी वाहतुकीची कोंडी व होणारे अपघात पाहता पावसाळ्यात या रस्त्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भ्वणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने 93 लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवले आहेत. सामाजिक कार्यकर्ते मं.गं. येवले व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी 25 जून रोजी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिका:यांना जवाबदार ठरविण्यात येऊन त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे येथील अधिका:यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम अर्धवट सोडून लोकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ होत असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडल्यास संबधित अधिका:यांची जवाबदारी निश्चित करावी. रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर झालेले 93 लाख रुपये कोठे व कसे वापरण्यात आले याबाबत चौकशी करून कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.

बेडकी ते चिंचपाडा या 15 किलोमीटर अंतरात वाकीपाडा, नवापूर शहर व रांयगण येथील तीन पुलांची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. तिनही पूल क्षतीग्रस्त  झाल्याने पूल पार करतांना वाहनचालक जीवमुठीत धरून मार्गक्रमण करीत आहेत. याआधीही या पुलांची दुर्दशा व दुरुस्ती झाली आहे. मात्र अशी दुरुस्ती अल्पकाळ टिकून राहिल्यानंतर परिस्थिती जैसे थे होत आली आहे. हे पाहता 93 लाख रुपये खर्चात तिनही पुलांची तातडीने व चांगल्या स्वरुपाची गुणात्मक व दर्जेदार अशी दुरुस्ती होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे झाले नसल्याने अधिकारी महाड सारखी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.