शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागात 60 रिक्त पदांमुळे कामांना अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:04 IST

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात नंदुरबारअंतर्गत येणा:या चार उपविभागात तब्बल 60 पदे ...

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात नंदुरबारअंतर्गत येणा:या चार उपविभागात तब्बल 60 पदे रिक्त असल्याने विविध कामे रखडली आहेत. कामे वेळेवर होण्यासाठी पदे तातडीने भरण्याची गरज आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, जल संपदा यांत्रिकी विभाग नंदुरबार अंतर्गत नंदुरबार, दोंडाईचा, उपसा सिंचन उपविभाग दोंडाईचा व द्वार उभारणी उपविभाग धुळे हे चार उपविभाग येतात. या चारही उपविभागामध्ये तब्बल 60 पदे रिक्त आहे. त्यात उपकार्यकारी अभियंता एका पदाचा समावेश असून उपविभागीय कार्यालयात वेतन प्रदान करणे, कार्यकारी अभियंता गैहजर असतांना त्यांचे काम पाहणे ही जबाबदारी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे असते. मात्र हे पद रिक्त असल्याने कामावर ताण पडत आहे. उपअभियंता पदाची चार पदे मंजूर आहेत पैकी तीन पदे रिक्त आहेत. चार उपविभागांना एक उपअभियंता पाहिजे पैकी फक्त दोंडाईचा यांत्रिकी विभागात एक उपअभियंता आहे. नंदुरबार, धुळे, उपसा सिंचन दोंडाईचा याठिकाणी हे पद रिक्त आहे. सहायक अभियंता श्रेणी-2 ची दोन पदे मंजूर आहेत पैकी एक रिक्त आहे. शाखा अभियंता श्रेणी-2 ची 17 पदे मंजूर असून त्यापैकी नऊ पदे रिक्त आहेत. सहायक अभियंता नसल्याने कार्यालय कोण सांभाळेल? साईटवर भेटी कोण देईल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  प्रथम लिपिकाचे एकच पद असून तेही रिक्त आहे. वरिष्ठ लिपिक आठ पदे मंजूर आहेत पैकी सहा पदे रिक्त आहेत. प्रत्येक उपविभागाला दोन वरिष्ठ लिपिक मंजूर आहेत मात्र सहा पदे रिक्त असल्याने कामांना अडथळा येत आहे. कनिष्ठ  लिपिकांची 13 पदे मंजूर आहेत मात्र त्यातील 11 पदे  रिक्त आहेत. यामुळे पत्र टाईप करण्यासाठी कनिष्ठ लिपिक नसल्याने कामांना उशीर लागतो. कधी कधी तर बाहेरून पत्र टाईप करण्याची वेळ या कार्यालयांवर येते. टंकलेखकाची सहा पदे मंजूर आहेत पैकी एक पद रिक्त आहे.  आरेखकाचे, अनुरेखक व भांडारपाल ही प्रत्येकी एक पद एक मंजूर असून तिन्ही पदे रिक्त आहे.  उपआवेक्षकाची तिन्ही पदे रिक्त आहेत. वाहन चालकांचीही  सर्व म्हणजे पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे विभागाचे मशिनरी पोकलेन, जेसीबी, डंपर, टिमर यांना चालवण्यासाठीही चालक नाही. कार्यकारी अभियंता यांच्या वाहनावरही चालक नसल्याने त्यांना तात्पुरता खाजगी चालकांची सोय करावी लागते.  दप्तरी, नाईक ही प्रत्येकी एक मंजूर असलेली पदे रिक्त असून 11 शिपाई पदांपैकी नऊ रिक्त जागा आहेत. कार्यालयात शिपाईच नसल्याने टेबलांवर, संगणकावर नेहमी धूळ असते. चौकीदाराची सहापैकी पाच पदे रिक्त असल्याने कार्यालय व आवारातील वस्तू चोरीला जात आहेत.  या विभागाला 86 पदे मंजूर असताना केवळ 26 पदांवर           कार्मचारी नेमणुकीला असून त्यांच्यावरच या विभागाचा गाढा सुरू आहे. त्यामुळे या कर्मचा:यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने तेही त्रस्त झाले आहेत. या विभागाकडून वरिष्ठांना दर महिन्याला स्मरणपत्र पाठवून रिक्त जागा भरण्याची मागणी केली. मात्र याबाबत कुणीही लक्ष देत नाही.