शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शंभर, वीस, दहा, पाचच्या नोटा रद्द होण्याच्या भितीने जमा करण्याकडे कल बॅंकांना मात्र आदेश नाही : नोटा खपविण्यासाठी अनेकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीच्या कटू आठवणी आजही अनेकांच्या मनात आहेत. आता पुन्हा १००, पन्नास, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीच्या कटू आठवणी आजही अनेकांच्या मनात आहेत. आता पुन्हा १००, पन्नास, दहा व पाचच्या नोटा बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापारींकडून कुणी या नोटा घेण्यास तयार नाहीत. बॅंकांना अद्याप या बाबत काहीही सुचना मिळालेल्या नाहीत. या नोटा बंद करतांना टप्प्याटप्प्याने होतील तसा आदेशही अद्याप निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नोटा जमा करण्याची घाई करू नये असे आवाहन बॅंकांनी केले आहे.  पाच ते १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होण्याची चर्चा सद्या सुरू आहे. याबाबत शासनाने अद्याप आदेश काढलेले नाहीत. असे असतांनाही या विषयाच्या चर्चेमुळे मात्र नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे. जुन्या नोटा जमा करण्यासाठी बॅंकामध्ये काहीजण जात आहेत. नियमित भरणा करण्यामध्ये या नोटा स्विकारल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात जुन्या नोटा भरणामध्ये येण्याचे प्रमाण वाढल्याचेही बॅंकांनी स्पष्ट केले. 

बॅंकामध्ये वाढला जुन्या नोटांचा भरणा...बॅंकामध्ये व्यापारी तसेच इतरा ग्राहकांकडून जुन्या नोटांचा भरणा वाढला आहे. बॅंका देखील त्या बिनधिक्कत स्विकारत आहेत. गेल्या काही दिवसात त्याचे प्रमाण वाढले आहे. नोटा बंदीचा मागील अनुभव वाईट असल्यामुळे नागरिक आता कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडील जास्तीत जास्त जुन्या नोटा खपविण्याच्या मार्गावर आहे. बॅंका जुन्या नोटा स्विकारत असल्या तरी ग्राहक कॅश काऊंटरवरून जुन्या नोटा घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 

नव्या नोटांची कॅश काऊंटरवर मागणीराष्ट्रीयकृत तसेच खाजगी बॅंकामधील कॅश काऊंटरवर पाच रुपये ते १०० रुपयांच्या नव्या नोटांचीच मागणी वाढली आहे. काही वेळा कॅशीयरशी देखील वादविवाद होत आहेत. त्यामुळे काही बॅंकांनी जुन्या नोटा बंद झालेल्या नाहीत त्यामुळे त्या स्विकाराव्या अशा सुचनाच दर्शनी भागावर लावल्या असल्याचे दिसून येत आहे. 

अद्याप आदेश नाहीत...  पाच, दहा, २०, ५० व १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद होतील याबाबत कुठलाही आदेश प्राप्त नाही. त्यामुळे या नोटांचा दैनंदिन व्यवहार सुरू असल्याची माहिती एका बॅंकेच्या अधिकारऱ्याने स्पष्ट केले. 

ग्राहकांकडून जुन्या नोटा दिल्या जातात, परंतु स्विकारल्या जात नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. निर्णय झालाच तर तो टप्प्याटप्प्याने होईल त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच नोटा स्विकाराव्या अशी अपेक्षा   आहे.   -चंपालाल राठोड, व्यापारी.

शासनाने किंवा आरबीआयने अद्याप जुन्या नोटांबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. असे असतांनाही ग्राहकांसह काही व्यापारी देखील जुन्या नोटा स्विकारत नसल्याची स्थिती आहे. शासनाने निर्णय घेण्यापूर्वी नव्या नोटा त्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.   -श्यामजीभाई पटेल, व्यापारी.