शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची केळी सातासमुद्रापार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:37 IST

हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केंद्र व राज्य राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता केवळ आपल्या ...

हिरालाल रोकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र व राज्य राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता केवळ आपल्या हिमतीवर व मेहनतीच्या जोरावर ब्राह्मणपुरी ता.शहादा येथील शेतकऱ्यांनी पिकवलेली केळी आखाती देशात निर्यात करून आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली निर्यात व्यापक चळवळ ठरली असून यातून शेतकऱ्यांना हमखास व भरघोस उत्पन्न मिळत आहे.केळी हे तसे नाशवंत पीक. केळीला शासनाने हमीभाव जाहीर केलेला नाही. परिणामी वर्षभर मेहनत करूनही परप्रांतीय व्यापारी देतील तोच भाव स्वीकारायचा व दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केळीचे उत्पादन घ्यायचे. यातून बºयाचदा परप्रांतीय व्यापाºयांनी परिसरातील शेतकºयांची केलेली आर्थिक फसवणूक यामुळे केळीची शेती करायची किंवा नाही अशा विवंचनेत स्थानिक शेतकरी असताना परिसरातील प्रगतीशील शेतकरी स्व.नरोत्तम मंगेश पाटील यांनी २०१६ केळी निर्यातीचा विचार केला. यासाठी त्यांनी गुजरात राज्यातील एका खाजगी कंपनीशी संपर्क साधून परदेशात निर्यातीसाठी योग्य असलेली केळी आपल्या भागात कशा पद्धतीने उत्पादित केली जाईल याबाबत माहिती व मार्गदर्शन घेऊन केळीची लागवड केली. त्यातून त्यांनी सर्वप्रथम आखाती देशात केळीची निर्यात केली. स्थानिक बाजारभावापेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने त्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाला पुढच्यावर्षी परिसरातील अनेक शेतकºयांनी सहमती देत निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या केळीचे उत्पादन घ्यावयास सुरुवात केली. स्व.नरोत्तम पाटील यांनी केळी निर्यातीच्या लावलेल्या या रोपट्याचे परिसरातील शेतकºयांनी वटवृक्षात रूपांतर केले आहे.कोल्हापूर येथील धरती अ‍ॅग्रो व गुजरात राज्यातील देसाई अ‍ॅग्रो व एनआयए अ‍ॅग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून निर्यातीसाठी योग्य असणाºया केळीची लागवड व उत्पादन घेतले जात आहे. परदेशात निर्यातीसाठी आवश्यक ते सर्व सोपस्कार या खाजगी कंपन्या करतात. केळीचे पीक तयार झाले की याच कंपन्या शेतकºयांच्या बांधापर्यंत येऊन शेतातून केळीची कापणी करून त्याची आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया पार पडल्यानंतर सहा व १३ किलो वजनाचे बॉक्स पॅकिंग केले जाते. त्यानंतर ही प्रक्रिया केलेली केली मुंबईपर्यंत नेल्यानंतर तेथून परदेशात निर्यात केले जाते.ब्राह्मणपुरी येथील संजय उत्तम पाटील, विठ्ठल मंगेश पाटील, रोहिदास मंगेश पाटील, गोपाळ मंगेश पाटील, जगन्नाथ नारायण पाटील, अनिल पाटील, अंशुमन पाटील आदी शेतकºयांनी गेल्या तीन वर्षात सर्वाधिक केळी आखाती देशात निर्यात करून शेतकºयांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे केळीच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाची कुठलीही मदत अथवा मार्गदर्शन या शेतकºयांना लाभलेले नाही. केवळ स्वत:च्या हिमतीवर व मेहनतीवर या शेतकºयांनी खाजगी कंपनीच्या सहकार्याने केळीची निर्यात यशस्वीपणे पार पाडली आहे.