शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बालाजीनगर परिसर मुलभूत सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी प्रभाग पाचमधील नागरिकांनी जिल्हाधिका:यांना साकडे घातले आहे. शहादा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी प्रभाग पाचमधील नागरिकांनी जिल्हाधिका:यांना साकडे घातले आहे. शहादा नगरपालिकेचे मतदार असूनही शहर हद्दीत नसल्याने पालिका प्राथमिक सुविधा पुरवत नसल्याची तक्रार तलाठीनगर, बालाजीनगर, कुबेरनगर, शिवसुंदरम् नगर या परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिका:यांकडे केली आहे.शहादा शहराला लागून असलेल्या तलाठीनगर, बालाजीनगर, कुबेरनगर, शिवसुंदरम्नगर आदी परिसरातील जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना निवेदन देऊन पालिकेकडून वीज, पाणी, रस्ते या सुविधा मिळण्याची मागणी केली आहे. हा सर्व परिसर पालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये येतो. या परिसरातील नागरिक पालिकेचे मतदार आहेत मात्र हा परिसर पालिका हद्दीत नसल्याने पालिकेकडून प्राथमिक सुविधा मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वखर्चाने कूपनलिका करून पाण्याची सोय केली आहे. मात्र यापैकी अनेक कूपनलिका आता बंद पडल्याने या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने पालिकेने तातडीने या भागातील पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी आहे. या भागात खासदार डॉ.हीना गावीत यांच्या निधीतून गेल्या दोन वर्षापासून हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले आहेत. मात्र पालिकेतर्फे वीज जोडणी न करण्यात आल्याने त्याचा उपयोग होत नाही. याबाबत पालिकेकडे पाठपुरावा करूनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आमदार उदेसिंग पाडवी यांनी गेल्यावर्षी या भागात पथदिवे बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रभागातून निवडून गेलेले नगरसेवकही आमच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागातील पाणीटंचाईची समस्या त्वरित न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर उत्तम चौधरी, दिलीप चौधरी, नरेंद्र चव्हाण, बन्सी राजपूत, भालचंद्र शुक्ल, पंढरीनाथ सोनवणे, अशोक भदाणे, विक्की रावताळे, जंगेश पाटील, केवलराम चौधरी, प्रेम पाटील आदींच्या सह्या आहेत.