शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निकषांमुळे किसान मानधन योजनेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध निकष आणि अटींमुळे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला जिल्ह्यात अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध निकष आणि अटींमुळे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला जिल्ह्यात अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. 9 ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली असली तरी तिला नगण्य प्रतिसाद आहे. यासाठी गावागावात तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. किमान प्रतिमाह पेन्शन वाढविणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया शेतक:यांच्या आहेत. 9 ऑगस्ट पासून प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आली             आहे. 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्टर्पयत शेती असलेले जिल्ह्यातील सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभाथ्र्यांना वयाची 60 वर्षे पुर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान        योजनेमध्ये लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेमध्ये पात्र आहेत. योजनेत         सहभागी होण्यासाठी गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करताना लाभार्थी शेतक:यास          कोणत्याही  प्रकारची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. नोंदणीनंतर लाभाथ्र्याच्या योजनेत नोंदणी केलेल्या  बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची            रक्कम ऑटो डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. शासनातर्फे तेवढ्याच प्रमाणात रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम वयानुसार प्रतिमाह साधारण 55 ते 200 रुपयार्पयत असेल. वृद्ध शेतक:यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. लाभाथ्र्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पती किंवा प}ीला योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी नोंदणीसाठी गावनिहाय   लाभार्थी नोंदणी कॅम्प आयोजित   करण्यात येणार आहे. तसेच लाभाथ्र्यांना पेन्शनकार्ड देण्यात येणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी राज्य विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना किंवा प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेचे लाभार्थी, घटनात्मक पदावर काम करणारे व्यक्ती, आजीमाजी मंत्री, संसद सदस्य, विधीमंडळ सदस्य, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवत असेलले किंवा निवृत्त कर्मचारी, आयकर भरणारी व्यक्ती, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, आकीर्टेक्ट आदी व्यवसायातील व्यक्ती या योजनेचा  लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीत. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतक:यांनी ग्रामसेवक,  तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा आणि आपले                      सरकार केंद्रात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.