शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी ऑफ नंदनगरीतर्फे रॅलीद्वारे कोरोना लसीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज व  वजीही स्काऊट ग्रुपतर्फे कोरोना व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज व  वजीही स्काऊट ग्रुपतर्फे कोरोना व कोरोना लसीबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरोनाबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती रॅलीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज वजीही स्काऊट ग्रुपसोबतच स्मित हॉस्पिटल, लायन्स फेमिना क्लब व लायनेस क्लब, रोट्रॅक्ट क्लब ऑफ नंदनगरी, न्यू इंग्लिश स्कूल, उमर्दे खुर्दे यांनी सहभाग घेतला होता. कोरोना व कोरोना लसीबाबत जनजागृतीच्या रॅलीला प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या हस्ते हिरवा  झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात  आले. रॅलीचा शुभारंभ दीनदयाल चौक येथून झाला. तेथून हुतात्मा चौक, अहिल्याबाई विहीर, महात्मा गांधी पुतळा, पंडित जवाहरलाल नेहरू पुतळामार्गे तालुका क्रीडा मैदान येथे राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. खासदार डॉ. हिना गावित याही या रॅलीला सदिच्छा भेट देत सहभागी झाल्या. कोरोना जनजागृती रॅलीत बोहरी समाजाच्या वजीही स्काऊट ग्रुपचे बँड पथक हे मुख्य आकर्षण होते. या बँड पथकाने नंदुरबारकरांचे लक्ष वेधून घेतले. या वजीही स्काऊट बँड पथकाचे नेतृत्व रोटेरियन फकरुद्दीन जलगुणवाला यांनी केले होते. या रॅलीदरम्यान कोरोना व कोरोना लसीबाबत विविध जनजागृतीपर फलक लावण्यात आले होते. या रॅलीत न्यू इंग्लिश स्कूल, उमर्दे खुर्दे येथील विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. रॅलीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, प्रीतिष बांगड, जितेंद्र सोनार, बोहरी समाजाचे प्रमुख अदनान सफदारी, ॲड. सलीम वोरा, अय्याझ वोरा, फिरदोस लोखंडवाला, लायनेसच्या प्रांतपाल डॉ. तेजल चौधरी, तसनीम जलगुणवाला, लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा डॉ. गायत्री पाटील, सचिव मीनल म्हसावदकर, दीपा वाडेकर, कांचन मुलानी, शीतल चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे फकरुद्दीन जलगुणवाला, आकाश बेदमुथा, दिनेश साळुंखे, इसरार सय्यद, किरण दाभाडे, प्रवीण येवले, फय्याझ खान, इक्बाल शेख, विनोद जैन, अब्बास काटावाला, जुझेर बोहरी, मुर्तुझा वोरा, रोट्रॅक्ट क्लब नंदनगरीचे इंद्रिस वोरा आदी उपस्थित होते. रॅलीदरम्यान शहरातील हुतात्मा स्मारक येथे बालशहीद, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मारकांना अभिवादन करण्यात आले, तसेच कोरोनाबाबत राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले होते.