शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

शहाद्यात विस्कळीत घडी बसविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहर कोरोना मुक्त झाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काही ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहर कोरोना मुक्त झाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काही नियम शिथिल करून शहराची विस्कळीत झालेली घडी बसवण्याचा प्रयत्न केला जात असताना शासनाचे नियम धाब्यावर बसून, शहरातील मेन रोडवर असलेल्या कापड विक्री करणाºया व्यवसायिकांनी फज्जा उडवविला आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी आहे.कापड विक्री करणाºया दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम न बाळगता ग्राहकांमध्ये अंतर न ठेवता गर्दी केली जात आहे. नियमाप्रमाणे दुकानांमध्ये केवळ पाच ग्राहकच घेणे बंधनकारक असताना एकाच वेळी ४० ते ५० ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. ही गंभीर बाब असून, या होणाºया गर्दीमुळे पुन्हा शहादा शहर हे कोरोनाच्या विळख्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानात त्यांनी कोणत्याही प्रकारचे निर्जंतुकीकरण करणारे औषध ठेवलेले नाही. केवळ ५६ दिवस दुकाने बंद होती. सवलत मिळाल्याने केवळ पैसा कमवणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसून, वाजवी पेक्षा जास्त पैसे ग्राहकांकडून घेतले जात आहे. संबंधीत अधिकाºयांनी याची तत्काळ दखल घेऊन शासनाच्या नियमाची पायमल्ली करणाºया व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.सेल्समध्ये कपडे विक्री व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहेत का हा भाग चौकशीचा असून, नगरपालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी व या व्यवसायाला परवानगी असेल तर त्यांनाही नियम लागू आहेत की नाही याची चौकशी करावी. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा अधिकार यांना दिला कोणी ही गंभीर बाब आहे. मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी अशी, मागणी आहे.शहरात व्यवसाय करणाºयांसाठी नियमात शिथीलता केली आहे. परंतु भविष्यात शहराच्या दृष्टीने प्रत्येक व्यावसायिक, व्यापार अनेक उद्योजकांनी काळजी घेणे बंधनकारक आहे. दरम्यान नगरपालिका प्रशासनाने हंगाम रेडीमेड कापड दुकानावर पाच हजार रूपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करण्यात आल्यावरदेखील बुधवारी सेल्स कापड विक्री करणाºया दुकानदारांनी कायद्याची पायमल्ली केली आहे. मंगळवारी रेडीमेड कापड विक्री करणाºया व्यावसायिकावर ४५ हजार रूपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.यापुढे कोणत्याही व्यवसायिकाने किंवा कापड विक्रेत्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करीत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे संबंधितांनी नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता नियमांचे पालन करून सहकार्य करावे. तसेच नागरिकांनीही प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे. अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.-डॉ.राहुल वाघ, मुख्याधिकारी, न.पा.शहादा