शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी येथे ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा :   शहादा तालुक्यातील वडाळी येथे सोने-चांदी खरेदी-विक्रीची दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरी करण्याच्या प्रयत्नात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा :   शहादा तालुक्यातील वडाळी येथे सोने-चांदी खरेदी-विक्रीची दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना आपणास कोणीतरी पाहत असल्याचे समजून आल्यानंतर त्यांनी गावातून पळ काढला. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच जवळील कोंढावळ या गावी घरातून दागिने व रोख रक्कम तसेच परिसरात डिझेल व पेट्रोल चोरीच्या घटना घडल्या आहेत.वडाळी गावात मुख्य बाजारपेठेत चैतन्य ज्वेलर्स नावाचे दागिने खरेदी-विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या दुकानासमोर चोरटे उभे असल्याचे समोर राहणा-या ग्रामस्थांना दिसून आले. दरम्यान, चोरटे कुलूप तोडत असल्याचे दिसून आल्यानंतर ग्रामस्थांनी गावात संपर्क करण्यास सुरुवात केली. चोरी करणा-या चोरट्यांना आपणास कोणीतरी पाहत आहे, असा सुगावा लागल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. ग्रामस्थांनी रात्री पोलीस पाटलांना घटनेची माहिती कळवली. यावेळी माजी उपसरपंच अभय गोसावी, प्रदीप गिरीगोसावी, जयेश माळी यांनी गावातील युवकांना सोबत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिली गस्तीवरील पोलीस पथकाने तातडीने शिरपूर ते शहादा आणि कोंढावळ ते बोराळा या रस्त्यांवर शोध सुरू केला; परंतु चोरटे मिळून आले नाहीत. दरम्यान, बाजारपेठेतील कापड दुकान व किराणा दुकानात लावलेल्या सीसी कॅमे-यात हा प्रकार कैद झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने गावात भेट देत माहिती घेतली. यामुळे वडाळी व परिसरात भीतीचे वातावरण आहे.