शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 10:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता  दिनांकावर आधारीत मतदार यादी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता  दिनांकावर आधारीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवार 15 जुलै रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या मतदारांना नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी यासाठी दुसरा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 15 जुलै रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात येईल. प्रारुप यादीविषयी हरकती व आक्षेप 30 जुलैपयर्ंत नोंदविता येतील. मतदार नोंदणी व मतदार यादी पुनरीक्षणासाठी 20 व 21 जुलै तसेच 27 व 28 जुलै रोजी विशेष      मोहिमेचे आयोजन करण्यात येईल. 5 ऑगस्ट रोजी पर्यवेक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत पडताळणी करण्यात येणार असून 13 ऑगस्टपयर्ंत हरकती व आक्षेप निकालात काढण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार यादी निरीक्षक आणि मुख्य निवडणूक अधिका:यांनी तपासणी केल्यानंतर 19 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत अर्हता दिनांकानुसार पात्र मतदारांची नावनोंदणी करण्यात येणार असून मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे संबंधित अधिका:यांना या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करून याद्यांमधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी व मतदार यादीबाबत काही आक्षेप अथवा हरकती असल्यास संबंधित तहसील कार्यालयात    विहीत मुदतीत सादर करावे.  मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.