शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा मुख्याध्यापक तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आश्रमशाळेतील शैक्षणिक कामकाजाबाबत नोटीसा देऊनही सुधारणा न करता थेट विनापरवानगी शाळेत गैरहजर आढळून आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आश्रमशाळेतील शैक्षणिक कामकाजाबाबत नोटीसा देऊनही सुधारणा न करता थेट विनापरवानगी शाळेत गैरहजर आढळून आल्याने धडगाव तालुक्यातील चुलवड येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान, बर्डी येथील मुख्याध्यापकाची वेतनवाढ  रोखल्याची माहिती प्रकल्पाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान,  प्रशासनाने घेतलेल्या कारवाईच्या  कडक भूमिकेने आश्रमीय कर्मचा:यांमध्ये खळबळ उडाली आहे.धडगाव तालुक्यातील चुलवड येथील शासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थी आश्रमशाळेतील असुविधांबाबत तळोदा प्रकल्पात तक्रार करण्यासाठी येत असल्याची वार्ता प्रकल्प प्रशासनास  मिळाली होती. प्रकल्पाधिकारी  जितेंद्र डुडी, सहायक प्रकल्पाधिकारी अमोल मेटकर, सुवर्णा सोलंकी व शिक्षण विस्तार अधिकारी एम.एस. कदम हे गुरूवारी आश्रमशाळेत पोहोचलेत. या वेळी विद्याथ्र्यानीच त्यांच्याकडे शाळेतील समस्यांचा  पाढा वाचला. शिवाय त्यांना देय असलेल्या सुविधादेखील मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान  होत असल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले.स्वत: मुख्याध्यापक डी.एन. पाटकरी हे प्रशासनाच्या भेटी वेळी विनापरवानगी गैरहजर आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रकल्प प्रशासनाने तडका फडकी निलंबनाची कारवाई केली असून, या आदेशात शालेय व्यवस्थापनावर नियंत्रण न ठेवणे, आस्थापनाकडे दुर्लक्ष करणे, मुख्याध्यापक पदाच्या जबाबदा:या पार न पाडणे, शाळेसाठी निधी उपलब्ध करूनही तो न वापरणे, शालेय व्यवस्थापन निधी खर्चाचा हिशोब कार्यालयास सादर न करणे आदी कारणे नमूद करून  याबाबत नोटीसा बजावून कामात सुधारणा  न करता खुलासाही दिला नाही. आपल्या हलगर्जीपणामुळे विद्याथ्र्यानी     पायी मोर्चा काढल्याचे म्हटले  आहे.दरम्यान, बर्डी, ता.अक्कलकुवा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तपासे यांच्यावरदेखील तेथील विद्याथ्र्याच्या तक्रारीवरून  वेतन वाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. आश्रमशाळेच्या या दोन मुख्याध्यापकांवर प्रकल्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे आश्रमीय कर्मचा:यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.