शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठय़ाच्या पाईपांनी ‘एअर’ पकडल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने शनिवारपासून शहरात नळांना पाणी आलेले नाही़ सोमवारी पालिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने शनिवारपासून शहरात नळांना पाणी आलेले नाही़ सोमवारी पालिकेने पाईपलाईन जोडून दिल्यानंतरही पाईपांनी ‘एअर’ पकडल्याने शहरात पाणी पोहोचू शकलेले नाही़ मंगळवारी दुपार्पयत शहरात सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े शहरात पाणीपुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्यात आली आह़े 8 व 9 ऑगस्ट रोजी अतीवृष्टीमुळे टोकरतलाव गावाजवळील नाल्याला  पूर    आल्याने पाईप लाईन तुटली होती़ यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा अनुभव नागरिकांना येत आह़े पालिकेच्या कर्मचा:यांनी सोमवारी पहाटेर्पयत पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण केले होत़े यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल या अपेक्षेने पंपींग स्टेशनवरुन पाणी सोडण्यात आले होत़े परंतू पाईपांनी एअर पकडल्याने पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होऊ शकलेले नाही़ परिणामी पाणी सोमवारी दुपार्पयत जिल्हा रुग्णालयार्पयतच आल्याची माहिती आह़े नंदुरबार शहरात एकूण 16 जलकुंभ असून तेथवर पाणी पोहोचते करण्यासाठी प्रेशर नसल्याने पाणी वितरणात अडचणी येत आहेत़ शहरात एकूण दीड कोटी लीटरची दर दिवशीची मागणी आह़े पाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिक हैराण झाले असून सोमवारी सकाळपासून रहिवासी वसाहतींमध्ये टँकर खरेदी करत गरज भागवण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले होत़े