शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हेरीटेज रेल्वेस्थानक येणार सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:19 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर नंदुरबार हे महत्त्वपूर्ण ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर नंदुरबार हे महत्त्वपूर्ण स्थानक असल्याने त्याला मॉडल स्टेशनचा दर्जा देण्यात आला होता़ या दर्जानुसार रेल्वेस्थानकही असावे यासाठी सुशोभिकरणाच्या कामांना वेग आला असून येत्या वर्षात प्रवाशांना रेल्वेकडून सुशोभित रेल्वेस्थानकाची पर्वणी मिळणार आहे़खासदार डॉ़ हीना गावीत यांच्याहस्ते रेल्वे स्थानक नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती़ पश्चिम रेल्वेच्या बांधकाम विभागालाच नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आल्याने आठ महिन्यात ते पूर्ण होणार आहे़ स्थानकासमोर पार्किंग व्यवस्था आणि पादाचारी पूल या दोन विशेष व्यवस्थांवर भर देण्यात आला असून जुन्या दगडी इमारतीचा मूळ ढाचा ‘जैसे थे’ ठेवत त्यावर नवीन मुलामा देण्याचे काम हाती घेतले गेले आहे़ बाहेरील बाजूस होणाऱ्या या सांैदर्ययीकरणात स्वयंचलित कारंजांचीही व्यवस्था करण्यात आली आहे़ गुजरात राज्यातील बलसाड मॉडेल रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर उभारल्या जाणाºया या रेल्वेस्थानकात जिल्ह्यातील आदिवासी कला आणि सांस्कृतिक वैविध्यतेची माहिती देणारे फलकही लावले जाणार आहेत़रेल्वेकडून एकीकडे बाह्य सुभोभिकरण होत असताना आतील भागात प्रवाशांसाठी पादाचारी पूल आणि ८४० मिलीमीटर उंचीच्या तिन्ही प्लॅटफार्मवर नव्याने शेड तयार करण्यात येणार आहे़ यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हातान्हात थांबवण्याचे टळणार आहे़ सोबतच रेल्वेस्थानकाव रॅक पॉर्इंट तयार करण्याचे काम सुरु आहे़ यातून याठिकाणी सिमेंट, खते आणि इतर गरजेचे साहित्य उतरवणे सोपे होऊन व्यावसायिकांना वाहतूकीचा द्यावा लागणारा खर्चही टळणार आहे़सुशोभिकरणाच्या या प्रक्रियेनंतर २०२० मध्येच रेल्वे नवीन चौथ्या प्लॅटफार्म निर्मिती करण्याच्या प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे़ तूर्तास दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ नवीन लाईनबाबत रेल्वेकडून कोणताही प्रस्ताव नसल्याने रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरणावर भर देण्यात येणार आहे़ स्थानकातील बुकींग आॅफीस आणि रिझर्वेशन काउंटर हे मोठ्या जागेत स्थलांतरीत करण्याची प्रक्रियाही नव्या वर्षात होणार आहे़१८८९ पासून पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर उभारण्यात आलेल्या नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या इमारतीत गेल्या १०० वर्षात तुरळक असे बदल झाले होते़ परंतू प्रथमच संपूर्ण स्थानकाचे विस्तारीकरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ यासाठी रेल्वेच्या बांधकाम विभागाने २ कोटी २५ लाख रुपयांचा मंजूरी देत निधी उपलब्ध करुन दिला आहे़ हे काम वेगात सुरु असून मार्च महिन्यात पूर्ण झाल्यानंतर सुशोभित अशी इमारत दिसून येणार आहे़ या इमारतीत खासकरुन प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात आले असून आगामी काळात याच प्रकारे काम होणार आहे़ पार्किंगची समस्या निकाली काढून तीन वेगवेगळ्या वाहनांच्या लेन तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या मध्यात पार्किंग व्यवस्था सामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहे़