शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात चायना मालाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात चायनीज मालाची आवक वाढण्याची शक्यता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात चायनीज मालाची आवक वाढण्याची शक्यता होती. परंतु यंदा बाजारात काहीअंशी उलट स्थिती असल्याचे दिसून आले आहे. बाजारात चायनीज मालच आलेला नसल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. शहरात दिवाळीत चायनीज लायटींग, शोभेच्या वस्तू, पणत्या यासह विविध वस्तूंची मोठी आवक केली जाते. सुरत, अहमदाबाद, दिल्ली, इंदाैर, मुंबई, कल्याण यासह इतर शहरात या मालाची आवक होते. शहरातील ठोक व्यापार्यांचे संपर्क असल्याने तेथून हा माल शहरात येतो. कोरोनामुळे चायनीज मालाबाबत निर्माण झालेली साशंकता आणि देशभरात चायनीज वस्तू वापराबाबत असलेले विरोधी वातावरण यामुळे यंदा दिवाळीपूर्वी होणारी मालाची आवक थांबली आहे. यामुळे व्यापारी हाती असलेल्या दिल्ली किंवा इंदाैरमेड मालाचा वापर करुन काम भागवत आहेत. खासकरुन दिवे आणि आकाशकंदील यांची मोठी आवक चीनमधून दरवर्षी होते. परंतु यंदा मात्र ही आवक झालेली नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. गेल्या काही वर्षात चायनीज मालाने भारतीय  दिवाळी काबीज केली होती. यातून बाजारात स्वस्त वस्तू उपलब्ध होत होत्या. परंतु यंदा चायनीज माल उपलब्ध धने स्वदेशी वस्तूंची मागणी वाढल्यास तेवढा पुरवठा होणे शक्य नसल्याने दिवाळीत किरकोळ वस्तूंचे दर महागण्याची शक्यताही बोलून दाखवण्यात आली. 

मोबाईल बाजारपेठेत येणार तेजी इलेक्ट्राॅनिक बाजारपेठ मात्र बर्यापैकी तेजीत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारात चायनीज बनावटीचे मोबाईल्स आणि इतर वस्तू विक्रीसाठी आहेत. मोबाईल बाजारात ब्रँडेड मोबाईल्समध्ये ६० टक्के कंपन्या ह्या चायनीज किंवा संबधित मोबाईलची बनावट ही चायनीज तंत्रज्ञानातून असल्याची माहिती देण्यात आली. दिवाळीत मोबाईल्सची विक्री वाढणार आहे. 

बाजारात सध्या मालाची आवक कमी आहे. चायनीज लायटींगला मागणी असली तरी यंदा माल नसल्याने ग्राहकही विचारणा करत नसल्याचे चित्र आहे. देशी लायटिंग सध्या उपलब्ध आहे. -निहाल ठाकूर, लायटींग विक्रेता. नंदुरबार.