शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापपूर परिसरात बिबटय़ाच्या भीतीने शेतीकामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर परिसरात बिबटय़ाचा  पुन्हा धुमाकूळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर परिसरात बिबटय़ाचा  पुन्हा धुमाकूळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. राणीपूर ते प्रतापपूर शिवारातील  विजय प्रकाश पाटील यांच्या शेतातील गुरांच्या गोठय़ातील दोन वर्षाच्या वासरूला बिबटय़ाने फस्त केल्याची घटना घडली. बिबटय़ाच्या दहशतीमुळे या परिसरातील शेतीकामेही रखडली आहेत.प्रतापपूर येथील विजय पाटील हे आपल्या  शेतातील गोठय़ात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना गायीने हंबरडा फोडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ गोठय़ाकडे धाव घेतली. या वेळी त्यांच्या दृष्टीस बिबटय़ा दोन वर्षाच्या वासरूला फरफटत नेत असल्याचे दिसून येताच त्यांनी गावाकडे धाव घेतली. या घटनेबाबत त्यांनी राणीपूर गावातील ग्रामस्थांना कळविले असता. ग्रामस्थांनी शेताकडे धावतली. दरम्यान तोर्पयत बिबटय़ाने दोन वर्षाच्या वासरूला फस्त केल्याचे निदर्शनास आले.घटनेबाबत वनविभागाला तत्काळ माहिती दिल्याने वनक्षेत्रपाल शेंडे,  वनपाल एन.पी. पाटील, वनरक्षक एल.टी. पावरा यांनी घटनेचा पंचनामा केला असता त्यांना ठिकठिकाणी बिबटय़ाच्या पायांचे ठसे आढळून आले. त्यामुळे बिबटय़ाने वासरूला फस्त केल्याची नोंद करण्यात आली. या वेळी वनविभागाच्या कर्मचा:यांनी घटनास्थळी फटाके फोडून मिरची पुडची धुरळी केली. दरम्यान, वनविभागाच्या अधिका:यांनी विजय पाटील यांना           गुरांना गावात घेऊन जाण्याचा सल्ला  दिला.तळोदा तालुक्यातील मोहिदा, कळमसरे येथे दिवसा बिबटय़ाचा संचार असल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने या परिसरात वनविभागाने गस्त  वाढवून बिबटय़ाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व पशुपालकांकडून होत आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

दोन महिन्यांपूर्वी प्रतापपूर परिसरात गुराख्याच्या बक:या व रखवालदाराच्या कुत्र्याला बिबटय़ाने फस्त केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात बिबटय़ाचा वावर वाढल्याचे दिसून येत असल्याने वनविभागाने याठिकाणी गस्त वाढवून बिबटय़ाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.