शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रूग्णालयाच्या चुकीच्या अहवालाने मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील ४० वर्षीय महिलेची अचानक प्रकृती खालावल्याने शहादा येथील खासगी रूग्णालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील ४० वर्षीय महिलेची अचानक प्रकृती खालावल्याने शहादा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रूग्णालयात या ४० वर्षीय महिलेचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्याने तीला कोरोना असल्याच्या चुकीच्या माहितीमुळे कुटुंबातील करोनाबाधित रूग्णाची शोधाशोध झाली. दरम्यान, कुटुंबातील १० जणांचा स्वॅब घेता असला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत असे की, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील एका ४० वर्षीय महिलेला हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना शहादा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या प्रवास इतिहासाची माहिती विचारल्यावर कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कुटुंबियांना दिल्यामुळे त्यांना धक्का बसला. या वेळी अंत्यविधीसाठी पूर्ण खबरदारी म्हणून पीपी कीट घालण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या कुटूंबियांनी पीपी कीट परिधान करून गावात अंत्यविधीसाठी आणल्यावर गावात अफवेला पेव फुटल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे त्यांचा नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मयत महिलेच्या कुटुंबातील एकूण १० सदस्यांचा स्वब घेण्यात आला व तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने मयत महिलेच्या नातेवाईकांना खाजगी रूग्णालयात दिलेल्या अर्धवट आणि चुकीच्या माहितीमुळे कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एका चुकीच्या माहितीमुळे संपूर्ण गावाची धाक धुक वाढल्याने संताप व्यक्त केला जात आहे.मृत्यू झालेली ४० वर्षीय महिला कोरोना संशयित असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना देण्यात आली होती. त्यासाठी कुटुंबातील १० जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामुळे गावात धाक धुक वाढली होती. दरम्यान या १० जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.