शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी ऊस करपला तर केळीवर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:05 IST

गुलाबसिंग गिरासे ।  लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील मोड शिवारात उसाच्या बियाण्यासाठी लावलेला ऊस पाण्याअभावी करपल्याने शेतक:याला ...

गुलाबसिंग गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड शिवारात उसाच्या बियाण्यासाठी लावलेला ऊस पाण्याअभावी करपल्याने शेतक:याला प्रचंड नुकसान सहन करावे लागले तर कळमसरे शिवारातही पाण्याची पातळी खोल गेल्याने एका शेतक:यावर केळीच्या उभ्या झाडांवर नांगर फिरविण्याची वेळ आली. पजर्न्यमानाची स्थिती दरवर्षी अशीच राहिली तर सुजलाम् सुफलाम् असलेल्या या परिसरातील शेतक:यांवर मोठे संकट येणार आहे.तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकरी प्रवीण रमण नवले यांनी आपल्या मोड शिवारातील पाच एकर क्षेत्रात बियाण्यासाठी उसाची लागवड केली होती. कर्नाल 238 या जातीच्या उसाची बियाण्यासाठी त्यांनी जुलै 2018 मध्ये लागवड केली होती. जास्त उत्पन्न देणारी ही उसाची जात असल्याने परिसरातील शेतक:यांनाही त्याचा लाभ होईल म्हणून नवले यांनी पाच एकर क्षेत्रात लागवड केली. हे बियाणे तयार झाल्यानंतर शेतक:यांना विकून उर्वरित बियाणे स्वत:च्या शेतात लागवड करण्याचे नियोजन नवले यांनी केले होते. परंतु मागीलवर्षी पाऊस कमी झाल्याने या परिसरातील पाण्याची पातळी कधी नव्हे एवढी खोल गेली आहे. त्यातच नवले यांच्या शेतातील कूपनलिकाही आटली. त्यामुळे उसाची वाढ खुंटून हे बियाण्यासाठी लावलेले उसाचे पीक अक्षरश:                करपत आहेत. तापमानाची स्थिती अशी राहिली व पाऊस लांबला तर उसाचे बियाणे या शेतक:याला काढून फेकावे लागणार आहे. या पिकासाठी त्यांना आतार्पयत एकरी 32 हजार रुपये खर्च आला आहे. पाण्याअभावी उसाचे पीक वाया जाणार असल्याने या शेतक:यांला आर्थिक नुकसानीचा फटका बसणार  आहे.कळमसरे, ता.तळोदा शिवारातील केळी उत्पादक शेतकरी भगवान गोविंद लोहार यांनी आपल्या शेतात केळी पिकाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील केळीच्या झाडांची साडेतीन ते चार फुटार्पयत वाढ झाल्यानंतर कुपनलिका आटली. वाढते तापमान व केळी पिकाला पुरेसे पाणी न               मिळाल्याने झाडांची वाढ खुंटून ते कमजोर झाल्याने शेवटी लोहार यांच्यावर           केळीच्या झाडांवर नांगर फिरविण्याची वेळ आली. ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर मारून या शेतक:याला केळीचे पीक नेस्तनाबूत करावे लागले. लोहार यांचाही केळी पिकासाठी एकरी 27 हजार रुपये खर्च झाल्याने त्यांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले.पावसाची स्थिती जर दरवर्षी अशीच राहिली तर आतार्पयत शेतीच्या बाबतीत सुजलाम् सुफलाम् म्हणून ओळखल्या जाणा:या या परिसरातील शेतक:यांवर मोठे संकट कोसळण्याची भीती जाणकार शेतक:यांकडून व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्यातील मोड व बोरद परिसरातील शेतक:यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार केळी, ऊस, पपई आदी महागडय़ा पिकांची लागवड केली. मात्र यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याची पातळी झपाटय़ाने खोल गेली. परिणामी शेतक:यांना छातीवर दगड ठेवून या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. यंदा पडलेला दुष्काळ व त्यातच पाण्याअभावी पिके नष्ट होत असल्याने या पिकांसाठी केलेला खर्च वाया जात आहे. परिणामी शेतक:यांवर कजर्बाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने या नुकसानीची दखल घेऊन या परिसरातील शेतक:यांना आर्थिक मदतीसाठी प्रय} करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.