शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चातर्फे आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने आणि आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिल्याने मराठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने आणि आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिल्याने मराठा क्रांतीमोर्चातर्फे शनिवाराचे रास्ता रोको रद्द करून त्याऐवजी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठविणेबाबत ठोस निर्णय घेणे, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणे व मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु महाराष्ट्र शासनाने वरील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले. तसेच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करुन येथील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज नंदुरबार जिल्ह्याच्यावतीने जगताप वाडी चौफुली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन फटाके फोडण्यात आले. तसेच पेढे वाटून आंदोत्सव साजरा करण्यात आला. व सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.तसेच आज रविवार रोजी डी.आर.हायस्कुल जवळ होणारे एमपीएससी परीक्षा बंद आंदोलन ही मागे घेण्यात आले. आंदोलन जरी स्थगित करुन मागे घेण्यात आले असले तरी मराठा समाजाचे आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती पुर्णत: उठवून आरक्षणाचा लाभ समाजातील विद्यार्थी व युवकांना मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा लढा हा अखेरपर्यंत सुरु राहील. मराठा आरक्षणाची पुढील आंदोलनाची दिशा राज्यस्तरीय समिती मार्फत पुढील काळात आक्रमक स्वरुपात करण्यात येईल. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. आज रोजी सकल मराठा समाजातील सर्व समाज बांधव व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.