शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी, युतीच्या ‘गणिता’कडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क   नंदुरबार : एस.टी.प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच निवडणुकांपासून सातत्याने आमदार डॉ.विजयकुमार गावीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क  नंदुरबार : एस.टी.प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच निवडणुकांपासून सातत्याने आमदार डॉ.विजयकुमार गावीत हे निवडून येत आहेत. यंदा भाजपतर्फे त्यांचीच उमेदवारी जवळपास निश्चित आहे. दरम्यान, आघाडी व युती होते किंवा कसे यावर उमेदवारीचे गणित अवलंबून राहणार आहे. आघाडी व युतीअंतर्गत नंदुरबार मतदारसंघ हा आघाडीतर्फे राष्ट्रवादीला तर युतीतर्फे शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. गत निवडणुकीत युती व आघाडी नसल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली होती. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपतर्फे उमेदवारी केली होती. यंदा युती झाल्यास ही जागा भाजपसाठी सोडावी लागणार आहे. तर आघाडी झाल्यास ही जागा राष्ट्रवादीकडे कायम राहील. गेल्या निवडणुकीत आमदार डॉ.गावीत व काँग्रेसतर्फे कुणाल वसावे यांच्यात लढत रंगली होती.  त्यावेळी डॉ.विजयकुमार गावीत यांनी जवळपास 26 हजार मतांनी विजय मिळविला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपने नंदुरबार विधानसभा मतदारसंघात जवळपास 70 हजारांचा लीड घेतला आहे. त्या अनुषंगाने            भाजपला या मतदारसंघात एकतर्फी लढत राहील अशी अपेक्षा आहे. परंतु लोकसभा आणि  विधानसभा निवडणुकीचे गणित वेगवेगळे असते.लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळण्यावरून नाराज झालेले भाजपचे नेते डॉ.सुहास नटावदकर यांना किंवा त्यांच्या घरातील कोणास उमेदवारी मिळते किंवा कसे हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे. 2009 च्या निवडणुकीत सुहासीनी नटावदकर यांनी अपक्ष उमेदवारी करीत आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना चांगली लढत दिली होती. त्याची पुनरावृत्ती होते किंवा कसे, याचीही उत्सुकता आहे.यंदा आघाडी व युती झाल्यास उमेदवार कोण राहणार ? यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. याशिवाय काँग्रेसची भुमिका कशी राहील यावरही भाजप उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांची लढत ठरणार आहे. 

पक्षनिहाय इच्छुक उमेदवार

भाजपडॉ.विजयकुमार गावीत, डॉ.सुप्रिया गावीत, कुमुदिनी गावीत

काँग्रेसकुणाल वसावे,रमेश गावीत, विक्रमसिंग वळवी.

शिवसेनाविरेंद्र वळवी, सुहासिनी नटावदकर, डॉ.समिधा नटावदकर

राष्ट्रवादी व इतरराष्ट्रवादीकडून विकास वळवी तर बहुजन वंचीततर्फे डॉ.अंतर्लीकर