शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आला वासुदेव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:08 IST

मनाचा थांगपत्ता लागू देतील ते नेते कसले हो..! श्राद्ध पक्ष आणि राजकारणातील अनिश्चितता यामुळे वासुदेवही बुचकाळ्यात पडला आहे. गेल्या ...

मनाचा थांगपत्ता लागू देतील ते नेते कसले हो..!श्राद्ध पक्ष आणि राजकारणातील अनिश्चितता यामुळे वासुदेवही बुचकाळ्यात पडला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कानावर पडणा:या चर्चा, गप्पांमुळे संभ्रमावस्था कायम असल्याचे वासुदेवाच्या एकुण लक्षात आले. श्राद्धपक्ष संपल्यानंतर आणि एकदाची युतीचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात आणखी मोठय़ा घडामोडी होतील हे मनात ठरवून वासुदेव सकाळी दान मागण्यास निघाला. आज त्याने बाजारपेठेत न जाता दाटीवाटीच्या वस्तीत जावून दान मागण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर निघत तो एका चौकात आला. तेथ फक्कड चहा घेतल्यानंतर उत्साहात तो जवळच असलेल्या वस्तीत दान मागण्यासाठी घुसला. वस्ती दाटीवाटीची, त्यामुळे सकाळची धावपळ, महिलांची धुणी, भांडे उरकण्याची घाई सुरू होती. अशातच दान मागण्यासाठी त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली. एक गिरकी घेत नाही तोच लहान मुलांचा गराडा त्याच्याभोवती पडला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात माणसांचा गराडय़ाला कंटाळलेल्या वासुदेव बाळगोपाळांच्या गराडय़ात रमला.. काही घरे दान मागून वस्तीतील एका मंदीराजवळ आला. तेथे सात ते आठजण गप्पा मारत बसलेले होते. त्यांच्या हातात दोन ते तीन वर्तमान पत्र होते. त्यातील बातम्या वाचून त्यांची चर्चा रंगली होती. कानोसा घेण्यासाठी वासुदेव थकल्याचे सांगत तेथील ओटय़ावर बसला.. आणि गप्पा ऐकु लागला. पक्षांमधील इनकमींग आणि आऊटगोईंग श्राध्द पक्षामुळे थांबलेले असले तरी येत्या काळात अर्थात नवरात्रीत ते आणखी मोठय़ा प्रमाणावर होणार हे त्यातील एकजण सांगत होता. एकाने युती होणारच नाही. झालीच तर आपल्याच जिल्ह्यात तीनजण बंडखोरी करतील असा दावा केला. युती झाली नाही तर एकाच पक्षाकडून एकाच घरातील चारजण उभे राहतील असा दावा दुस:याने केला. त्यावर आणखीएकजण पुढे आला. हे तर काहीच नाही.. युती झाली तर आणखी काही तरी मोठे होणार आहे हे सांगून सर्वानाच डोके खाजविण्यास भाग पाडून गेला. वासुदेव हे सर्व लक्षपुर्वक ऐकत होता. त्या सर्वाच्या चर्चा वासुदेव ऐकत असल्याचे एकाने पाहिले आणि वासुदेवालाच प्रश्न केला. काय हो वासुदेवा.. काय चालू आहे. तुम्ही तर सर्वच भागात फिरता कुठे काय स्थिती, चर्चा आहे.. सांगाल काय.. वासुदेवाने जसे राजकारणातील काहीच माहिती नाही असा भाव चेह:यावर आणून आ... कुठे.. कुणाची स्थिती.. असे अडखळत बोलू लागला. काय सागांव दादा जिकडे जावे तिकडे सध्या राजकारणच ऐकायला येतेय. प्रत्येकजण आपला तर्क लावतोय. पण नेते काही त्यांच्या मनाचा आणि निर्णयाचा थांगपत्ता लागू देत नाही बघा.. चालू द्या तुमच्या चर्चा..मला दान मागायचं.. म्हणून वासुदेव उठला आणि पुढील घरात दान मागू लागला..    -वासुदेव