शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीनंतर आता सरपंच निवडीकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

नंदुरबार तालुक्यातील ४१ तर शहादा तालुक्यातील ३५ अशा ७६ ग्रामपंचायतींची सोडत यापूर्वी काढण्यात आली होती. यात नंदुरबार तालुक्यातील न्याहली ...

नंदुरबार तालुक्यातील ४१ तर शहादा तालुक्यातील ३५ अशा ७६ ग्रामपंचायतींची सोडत यापूर्वी काढण्यात आली होती. यात नंदुरबार तालुक्यातील न्याहली ही ग्रामपंचायत एस.टी.प्रवर्गासाठी तर जूनमोहिदा ही एस.सी.प्रवर्गासाठी राहणार आहे. तर शहादा तालुक्यातील पुसनद ही एस.टी. तर टेंभे ता.शहादा व कुढावद तर्फे सारंगखेडा या ग्रामपंचायती एस.सी. प्रवर्गासाठी राखीव राहतील. २०२० ते २०२५ या दरम्यानच्या कालावधीतील हे आरक्षण राहणार आहे. दरम्यान ८६ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार असल्याने त्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

नंदुरबार तालुक्यातील २०, शहादा तालुक्यातील २७, धडगाव १६, नवापूर १४, तळोदा सात तर अक्कलकुवा तालुक्यातील १ अशा ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लागू झाला होता. यांतर्गत १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. यातून त्या ग्रामपंचायतीत त्या संवर्गाचा उमेदवार निवडून आला आहे किंवा कसे यानुसार सरपंच निवडीची प्रक्रिया होणार आहे. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा व नवापूर हे चार तालुके १०० टक्के पेसा क्षेत्रात असल्याने त्याठिकाणी अनुसूचित जमाती संवर्गातील पुरुष किंवा महिला हे आरक्षणानुसार सरपंच होतील. नंदुरबार आणि शहादा तालुक्यात मात्र काही अंशी सरपंचपदाच्या आरक्षणानुसार उमेदवार शोधण्याकडे लक्ष लागून राहिल.

पुढील प्रक्रिया सुरु

गुरुवारी ३१९ पेसांतर्गत ग्रामपंचायतींचे आरक्षण काढले गेल्यानंतर नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या आरक्षणानुसार सरपंच निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानुसार प्रथम सभा होऊन सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बहुमताकडे लक्ष

नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यातून निवडून आलेल्यांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. या गावांमध्ये एक किंवा दोनच जागा या संवर्गासाठी होत्या. यातून या उमेदवारांना सरपंच पदाची लाॅटरी लागणार आहे.