शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौफुलीवरील अतिक्रमण काढले

By admin | Updated: March 9, 2017 23:32 IST

इतर ठिकाणी जैसे थे स्थिती : बांधकाम विभागासह पालिकेनेही पुढाकार घेण्याची मागणी

नंदुरबार : वाघेश्वरीचौफुलीवरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर काढले. अशीच कारवाई नवापूर चौफुली आणि करण चौफुलीवरदेखील केली तर या चौकांचेही सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.शहरातील वाघेश्वरी चौफुलीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. चारही बाजूंनी लहान, मोठ्या टपºया, हातगाड्या लावण्यात येत होत्या. शिवाय अनधिकृत वाहनथांबा तयार झाला होता. परिणामी या भागातील चारही रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली होती. सहा महिन्यात तीन जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागला   होता. ही बाब लक्षात घेता या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात    यावे, अशी मागणी वाढली होती. त्याची दखल घेत अखेर   चौफुलीवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.पूर्वी या ठिकाणी कच्चे अतिक्रमण होते. त्यानंतर काहींनी त्याच ठिकाणी पक्के अतिक्रमण केले. भर रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सध्या दोंडाईचा व्हाया विसरवाडी व कुकरमुंडा अशी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परिणामी शहरातील चारही चौफुलींवरील वाहतूक व्यवस्था लावताना कसरत होत असते. त्यामुळे अतिक्रमण काढणे जिकिरीचे झाले होते.पक्का रस्ता करावाअतिक्रमण काढलेल्या जागेवर डांबरीकरण करावे व पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी अडथळे लावावे, अशी  मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी दोन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. परंतु लागलीच १५ दिवसांनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत               असते. या वेळीदेखील तसे होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.नवापूर चौफुलीवरही तीच स्थितीशहरातील नवापूर चौफुलीवर तीच स्थिती निर्माण झाली आहे. लगतच असलेले जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद यासह इतर कार्यालये पहाता या चौफुलीवरील वर्दळ वाढली आहे. त्यातच वळण रस्त्यावरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. रहिवास अतिक्रमणासोबतच व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. शासकीय कार्यालयांचा मुख्य मार्ग असल्यामुळे नेहमीच मोर्चा, रॅली या भागातून जात असते. त्यामुळे अडथळे येत असतात. या ठिकाणचे अतिक्रमण  काढण्यात यावे, अशी मागणी होत                        आहे.हीच स्थिती शहादा रस्त्यावरील करण चौफुलीची झाली आहे. या चौफुलीवर अतिक्रमण वाढले आहे. वाढती रहदारी लक्षात घेता या चौफुलीचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढल्यानंतरच ते शक्य होणार            आहे.२५ अतिक्रमणांवर हातोडा वाघेश्वरी चौफुलीवरील जवळपास २० ते २५ कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली. काही टपºया अद्यापही उभ्याच.पालिकेने ठेवलेले तक्रार निवारण केंद्राची लोखंडी टपरी तेथेच पडून. एकही दिवस हे केंद्र सुरू झाले नाही. परिणामी भंगारात जाणार लोखंडी टपरी.अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा व्यावसायिक जागा बळकावणार नाही यादृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज.नवापूर व कोरीटनाका चौफुलीवर अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची नागरिकांकडून मागणी.