शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर तळोद्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या वाळू वाहतूकदारांवर महाराष्ट्र शासनाच्या यासंदर्भातील परिपत्रक अटी व शर्तीचे पालन करून परराज्यातून वाळू व रेतीची वाहतूक ...

जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या वाळू वाहतूकदारांवर महाराष्ट्र शासनाच्या यासंदर्भातील परिपत्रक अटी व शर्तीचे पालन करून परराज्यातून वाळू व रेतीची वाहतूक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार परराज्यातून वाळू व रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना गौण खनिजाचा उत्खनन व वाहतूकसाठीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या वाळूची अनुज्ञापी क्षेत्रीय कार्यालयाने तपासून परराज्यातून आलेली वाळू वैध परवान्याद्वारे आल्याची खात्री प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना एम.एच.१८ एम- ९३९१ या क्रमांकाचे वाहन गुजरात राज्यातून १० टन रेती वाहतूक करताना तळोदा तालुक्यातील आमलाड येथे तळोद्यातील पथकाला आढळून आले. शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्याचा झिरो रॉयल्टी पास त्यांच्याकडे नसल्याने या वाहनावर कारवाई करण्यात आली व ते वाहन जमा करण्यात आले असल्याची माहिती तळोद्याचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिली. परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा वैध परवान्यापेक्षा जास्त आढळल्यास किंवा झिरो रॉयल्टीशिवाय वाहतूक केलेली आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दंडात्मक कारवाईला पात्र राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, तळोदा हा तालुका गुजरात राज्याच्या सीमेवर आहे. शेजारील हातोडा, सदगव्हाण, उभद आदी ठिकाणी गुजरात राज्यातील वाळूचे ठिय्ये कार्यरत आहेत. या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच सातपुड्यातील दुर्गम भागात वाळूची वाहतूक करण्यात येते. या भागात होणारी वाळूची अवैध व चोरटी वाहतूक रोखण्यासाठी तळोदा महसूल प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करणार आहे. तळोदा महसूल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे चेकपोस्टही उभारलेले आहेत. हे पथक चेकपोस्टवर कार्यरत राहणार आहे. शिवाय फिरते पथकही कार्यरत राहणार असून मोठ्या प्रमाणात वाळूच्या वाहतुकीवर मॉनिटरिंग करण्याचे नियोजन तळोदा महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.