शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी शिंदेला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

तळोदा : पुणे येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या कुटुंबातील पती, सासू व सासरे याची चौकशी होवून दोषी ...

तळोदा : पुणे येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या कुटुंबातील पती, सासू व सासरे याची चौकशी होवून दोषी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी तळोदा येथे क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार गिरीश वाखारे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, १७ जून २०२१ रोजी सासू-सासऱ्यांचा मानसिक, शारीरिक छळाला व विकृतीला कंटाळून विवाहिता साक्षी अमित शिंदे या युवतीने नाशिक येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. साक्षी हीचा विवाह ५ फेब्रुवारी २०१८ रोजी नंदुरबार येथे पार पडला होता. मात्र सासरवासीयांकडून वेळोवेळी तिचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. शेवटी छळाला कंटाळून तीने आत्महत्या केली. साक्षीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून सासरे एकनाथ विठ्ठल शिंदे, सासू सीमा एकनाथ शिंदे, पती अमित एकनाथ शिंदे सर्व राहणार मोड, ता.तळोदा, जिल्हा नंदुरबार, हल्ली मुक्काम अष्टविनायक कॉलनी वाडा रोड राजगुरुनगर जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समाजातील अशा प्रकारे नवविवाहितांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घातक प्रवृत्तीला आळा बसावा शिवाय त्यांच्यावर कायद्याचा वचक राहावा म्हणून या प्रकरणाची संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशी करण्यात येवून दोषींना कठोर शिक्षा मिळावी. जेणेकरून समाजात चांगला संदेश जाऊ शकतो. तसेच समाजात अशी वाईट वर्तणूक सहन करत असलेल्या महिलांच्या अत्याचाराला ही आळा बसू शकेल. पर्यायाने भविष्यात अशा वाईट घटना घडू नयेत म्हणून उपरोक्त प्रकरणी दोषींना शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर नवनीत शिंदे, महेंद्र गाढे, शांताराम गायकवाड, दिलीप जगदाळे, चुडामण मराठे, मोहन पोटे, मधुकर पवार, विनोद चव्हाण, अशोक चव्हाण, गणेश मराठे, खुशाल शिंदे, सुभाष शिंदे, संजय बोराणे, विश्वनाथ बोराणे, युवराज चव्हाण, नरेंद्र मराठे, विनोद मराठे, गणेश मराठे, चंद्रकांत मराठे, सुनील मराठे, जगन्नाथ मराठे, प्रभाकर उगले, दिनेश शिंदे, नीलेश चव्हाण, जगदीश बोर्डे, संजय बोडे, संजय गाढे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.