शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीदारच ठरला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असे कथानक बामखेडा येथील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात उलगडत आहे. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असे कथानक बामखेडा येथील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात उलगडत आहे. आता ज्याने साक्ष दिली होती तोच संशयाच्या भोव:यात अडकला आहे. त्याच्या साक्षीवरूनच खून झालेल्या महिलेच्या पतीला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे फिरविली असता साक्षीदारानेच महिलेचा खून केल्याचे समोर आले आहे. छोटू आधार काकडे, रा.बामखेडा असे संशयीताचे नाव आहे.11 नोव्हेंबर रोजी बामखेडा शिवारातील शेतात कलाबाई दयाराम गवळे (50) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात महिलेच्या कुटूंबाने घातपाताचा संशय घेतल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पोलिसांना काहीही धागेदोर सापडत नव्हते. अखेर गावातीलच गुराखी असलेल्या छोटू काकडे याने पोलीस पाटलांकडे जावून महिलेचा खून अंधश्रद्धेतून तिचा पती दयाराम गवळे आणि दाजी बिजू ठाकरे यांनी केल्याचे सांगितले होते. महिला ताईत बांधण्यास नकार देत असल्याने महिलेच्या पतीने ताईतनेच गळा आवळल्याचे त्याने सांगितले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी दोघांना अटक करून पाच दिवस पोलीस कोठडी दिली होती. परंतु तपासात धागेदोरे जुळत नसल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दुस:या दिशेने तपास सुरु ठेवला. छोटू काकडे हा पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात येवून संशयीतांबाबत विचारणा करीत होता. त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळविण्यात आले. घटनेच्या दिवशी काकडे कुठे होता. कसा शेतात गेला, कधी परत आला वगैरे माहिती काढल्यानंतर त्याला संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे त्याने अखेर नांगी टाकली. आपणच कलाबाई यांचा हाताने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. घटनेच्या दिवशी कलाबाई शेतात काम करीत असतांना बाजरीच्या कणसाचे ओङो डोक्यावर चढवून देण्याच्या बहाण्याने त्यांना अडोश्याला कपाशीच्या शेतात आणले. तेथे त्यांचा गळा दाबून खून केल्याचे त्याने सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. खून कशामुळे केला याचा उलगडा होणे बाकी आहे. कलाबाई यांच्याकडे पैसे होते ते घेण्यासाठीच त्याने खुन केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी काही गैरकृत्य करण्याचा तर त्याचा इरादा नव्हता याकडेही पोलिसांनी चौकशीचा रोख सुरू ठेवला आहे. काकडे यास अटक करण्यात आली असून पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली      आहे.घटनेचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी केला.     

पोलिसांनी अटक केलेला संशयीत आरोपी छोटू काकडे हा खून झालेल्या कलाबाई गवळे या महिलेच्या शेजारीच राहतो. त्यामुळे त्याने आपल्यावर संशय जावू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. खूनाच्या घटनेत त्याचा काही वाईट हेतू होता का?, किती दिवसापासून तो हा गुन्हा करण्यासाठी टपून बसला होता? केवळ पैशांसाठीच त्याने खून केला का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या सर्व प्रश्नांची तड लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान कायम आहे.