ज्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी सुरुवातीला पेरले होते त्यांच्या शेंगा तोडणीयोग्य झाल्या आहेत. सतत चार-पाच दिवसांच्या पावसामुळे पिकांमधील गवत वाढल्याने शेतकऱ्यांना निंदणीच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच कापसावर सततच्या पाण्यामुळे पाने आखडू लागल्याने सध्या फवारणी आणि खत लावण्यावर शेतकऱ्यांचा जोर दिसून येत आहे. पावसाने जरी उघडीप दिली असली तरी आता आकाश स्वच्छ दिसत असल्याने पुन्हा पाऊस येणार की नाही? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कारण अजूनही जय नगर परिसरातील लोंढरे, उभादगड, खापरखेडा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे नद्यांनाही पाणी आलेले नाही. परिणामी विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. म्हणून यावर्षी जय नगरसह परिसरातील नद्या वाहिल्या तरच रब्बी हंगाम येईल, तसेच खरीप हंगामही चांगला येईल. नाही तर नद्या न वाहिल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पन्न तर कमी येईलच, शिवाय रब्बी हंगामही धोक्यात येईल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
जय नगर परिसरात शेती कामांना वेग, नद्या-नाले अजूनही कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST