शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येऊन धरणे आंदोलन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यात आल़े प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता़ दुपारी 12 वाजता शहरातील नवापुर चौफुलीपासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयात सेविकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल़े यानंतर मोर्चा जिल्हा परिषदेकडे मार्गस्थ झाला़ जि़प प्रवेशद्वारासमोर सेविकांनी धरणे आंदोलन करत प्रश्न सुटेर्पयत सुरु ठेवण्याचा आग्रह धरला होता़ यावेळी प्रशासकीय अधिका:यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल़े यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात, नवसंजीवनी सदस्य गाभा समिती व विविध सेवाभावी संस्थांकडून सेविकांना दिल्या जाणा:या त्रासावर तोडगा काढावा, स्वयंसेवी संस्थांना परवानगीशिवाय अंगणवाडी केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये, सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे प्रलंबित एकरकमी पेन्शन योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अमृत आहार योजनेचे पैसे संपले असताना आहार सुरु ठेवण्याची सक्ती थांबवावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या़  जिल्ह्यातील सेविकांनी मोर्चात हजेरी लावली़