शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ मध्ये प्रशासनाला दिली गेली ६१० निवेदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भेडसावणाऱ्या दैनंदिन तसेच प्रलंबित समस्या सुटाव्यात यासाठी नागरिक प्रशासनाकडे दाद मागतात़ यासाठी निवेदन देणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भेडसावणाऱ्या दैनंदिन तसेच प्रलंबित समस्या सुटाव्यात यासाठी नागरिक प्रशासनाकडे दाद मागतात़ यासाठी निवेदन देणे हा प्रमुख आधार असून २०१९ या वर्षात जिल्हा प्रशासनाला तब्बल ६१० निवेदने प्राप्त झाली आहेत़ नागरिकांनी दिलेल्या या निवेदनांची दखल घेण्याचे काम नव्या वर्षातही सुरु राहणार आहे़सनदशीर मार्गाने आपले म्हणणे मांडत शासनाला नेमकी समस्या मांडून देण्याच्या या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सामान्य नागरिक, धार्मिक संघटना, सेवाभावी संस्था ह्या गेल्या वर्षभरात पुढे राहिल्या होत्या़ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी निवेदन दिली गेली होती़ संकलित केलेल्या निवेदनांचे वर्गीकरण करुन तक्रारी आणि समस्या या दोन प्रकारात विभाजन करुन त्यांची दखल घेतली गेली आहे़ राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मुद्द्यांची निवेदने ही थेट तेथपर्यंत पोहोचवली जातात़ जर एखाद्या विभागाची तक्रार किंवा त्यांच्याशी निगडीत समस्या असेल तर त्या विभागाच्या प्रमुखाला माहिती देऊन त्यावर कारवाई करण्यात असल्याने अनेकांच्या समस्या मार्गी लागल्या आहेत़जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनांची बरसात होत असताना जिल्हा परिषदेत मात्र निवेदनांची संख्या २०० च्या पुढेही गेलेली नाही़ यात प्रामुख्याने शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत वेळोवेळी आंदोलने करत प्रशासनाला निवेदने दिली आहेत़ त्यांची निवेदने राज्यस्तरावर पाठवण्यात आल्याने त्यांच्या मागण्यांची पूर्तता टप्प्याटप्प्याने होत असल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्हा मुख्यालयासह तहसील कार्यालयांमध्येही वर्षभर निवेदने देण्यात आली़ या निवेदनांना जिल्हा प्रशासनाकडे पाठवून त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाने केली होती़ यातील किती निवेदने निकाली निघाली याची माहिती मात्र प्रशासनाकडे नाही़४जिल्हाधिकारी यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयात जानेवारी महिन्यात ६६ निवदने देण्यात आली़ फेब्रुवारीमध्ये ५८, मार्च- ४२, एप्रिल- २३, मे-४५, जून-५६, जुलै-६६, आॅगस्ट-६३, सप्टेंबर-६५, आॅक्टोबर-२१ तर नोव्हेंबर महिन्यात ८१ निवेदने देण्यात आली आहेत़एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक तर आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम सुरु होता़ यादरम्यान कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने या दोन महिन्यातील निवेदने आणि आंदोलने यांची संख्या ही कमी दिसून आली होती़ डिसेंबर महिन्यात जिल्हा निवडणूकीची अधिसूचना लागू झाल्याने निवेदनांना ब्रेक लागला आहे़जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच पोलीस दलही आंदोलने, मोर्चे आणि धरणे यासाठी बंदोबस्त तैनात करुन व्यस्त होता़ जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान तब्बल २५० मोर्चे, धरणे आणि आंदोलने नंदुरबारसह ठिकठिकाणी करण्यात आली होती़ पोलीस ठाण्यांच्या पूर्वपरवानगीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय तसेच शहरातील विविध भागात ही आंदोलने करण्यात आली होती़ प्रामुख्याने राजकीय पक्षांकडून वर्षभरात मोर्चे काढण्यात आले होते़ तर विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर सामाजिक संघटनांनी आंदोलने केली़