शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नंदुरबारातील 86 हजार शेतकरी बसले आस लावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:37 IST

बोंडअळीमुळे नुकसानीचा कहर : प्रशासनाला पाठवावा लागला दुस:यांदा प्रस्ताव

मनोज शेलार । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 22 : कापूस बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील तब्बल 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने पुन्हा शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. आधीचा प्रस्ताव शासनाने नाकारल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळालेली असतांना जिल्ह्यातील शेतकरी वंचीत राहिले होते. आता नवीन प्रस्तावाबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.नंदुरबार जिल्ह्यात एकुण खरीप क्षेत्रापैकी केवळ कापूस पिकाचेच क्षेत्र तब्बल 35 टक्केपेक्षा अधीक आहे. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. गेल्यावर्षी तब्बल एक लाख चार हजार 981 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. परंतु सप्टेंबरनंतर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचा पंचनामा देखील करण्यात आला. परंतु नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतक:यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविलेला आहे. त्याबाबत अद्यापही काही निर्णय झालेला नाही.उत्पादन आले होते निम्म्यावरबोंड अळीचा प्रादुर्भाव सप्टेंबरमध्ये झाला होता. त्यामुळे शेतक:यांच्या हाती केवळ 60 ते 70 टक्के उत्पादन आले होते. बोंडअळीमुळे शेतक:यांचे अर्थकारण देखील कोलमडले होते. त्यामुळे अनेक शेतक:यांनी नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच कापसाचे पीक काढून फेकले होते.पंचनाम्यांचे आदेश उशीराबोंडअळी नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश शासनाने उशीराने काढले होते. तोर्पयत अनेक शेतक:यांनी आपल्या शेतातील कपाशी काढून फेकली होती. परंतु सातबारावर ज्यांचे कापूस पीक लागले होते अशा सर्वाची नोंद घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल 85 हजार 895 शेतक:यांचे 33 टक्केपेक्षा अधीक नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यांमध्ये करण्यात आली होती.नुकसान भरपाई नाकारलीशासनाने बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक:यांना नुकसान भरपाई टाळली होती. वास्तविक राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र असतांना नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी का पात्र ठरले नाहीत याबाबत मात्र प्रशासनाला देखील योग्य खुलासा करता आला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पीक पैसेवारी सर्वच गावांची 50 पैसेपेक्षा अधीक होती. त्यामुळे जिल्ह्यात एकही गाव दुष्काळग्रस्त जाहीर झालेले नव्हते. पावसाची सरासरी देखील 90 टक्केर्पयत होती. या सर्व बाबी   पहाता शासनाने नुकसान भरपाई देण्याचे टाळल्याचे बोलले जात   आहे.शेतक:यांमध्ये संतापवास्तविक इतर ठिकाणी नुकसान भरपाई मिळत असतांना जिल्ह्यातील शेतकरीच त्यापासून वंचीत राहिल्याने शेतक:यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला आहे. त्याबाबत निर्णय होणे अपेक्षीत असतांना अद्याप काहीही हालचाल झालेली नाही.प्रस्ताव मंजुर झाल्यास 89 कोटी रुपये मिळणारजिल्ह्यात कापूस पिकावर गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यात जिरायत 55 हजार 754 तर बागायत 40 हजार 47 हेक्टरचा समावेश होता. एकुण 95 हजार 802 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. या क्षेत्राचे पंचनामे करून प्रशासनाने एकुण 89 कोटी 65 लाख रुपयांचे नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे आता नव्याने पाठविला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कृषीच्या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु कृषी विभागाला आणि प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नव्हते.