लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात 82 हजारापेक्षा अधिक गॅस जोडण्या देण्यात आल्या असून धुरमुक्त होण्याच्या दिशेने जिल्ह्याची प्रगती सुरू आहे. असे असले तरी अद्यापही 69 हजार 518 कुटूंबांकडे गॅस नसल्याचे चित्र आहे. स्वच्छ इंधन, चांगले जीवन आणि महिलांचा सन्मान या तीन सुत्रावर आधारीत ही योजना आहे. योजनेअंतर्गत कुटुंबातील कत्र्या महिलेच्या नावाने मोफत गॅस जोडणी देण्यात येत आहे. गावांना धूर विरहीत बनविण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. ही योजना महिलांसाठी विशेष ओळख ठरली आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागातर्फे बीपीएल कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष प्रय} करण्यात येत आहेत. याशिवाय जे कुटुंब या योजनेच्या निकषात बसतात त्यांच्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विस्तारीत उज्वला योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील 25 हजार 768, नवापुर 19 हजार 396, शहादा 17 हजार 249, तळोदा सात हजार 205, अक्कलकुवा सहा हजार 871 आणि अक्राणी तालुक्यातील पाच हजार 696 कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर 86 हजार 211 कुटुंब एक गॅसधारक आणि 58 हजार 367 कुटुंब दोन गॅसधारक आहेत. त्यामुळे गॅस जोडणी असलेल्या एकूण कुटुंबांची संख्या दोन लाख 25 हजार 947 झाली आहे. बिगर गॅसधारक 69 हजार 518 कुटुंब असून त्यांना उज्वला व विस्तारीत उज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशा एक हजार 586 कुटुंबांना आतापयर्ंत गॅस जोडणी मंजूर करण्यात आली आहे. केवळ 100 रुपयात ही गॅस जोडणी देण्यात येणार असून त्यासाठी गॅस एजन्सीकडे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. गॅस जोडणी नसेलल्या कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.
69 हजार कुटूंब गॅस जोडणीपासून वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:16 IST